ETV Bharat / state

नवविवाहीत पतीने पत्नीला कड्यावरून दिले ढकलून; पती ताब्यात - Kapil Bhaskar

मध्यप्रदेश येथून सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी नाशकात नवदाम्पत्य आले होते. दर्शन घेतल्यानंतर शितकड्यावरून पतीने पत्नीला ढकलून दिले.

दाम्पत्य
author img

By

Published : Jul 15, 2019, 5:54 PM IST

नाशिक - वणी येथील सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी आलेल्या पतीने शितकड्यावरून नवविवाहित पत्नीला ढकलून दिल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला असून, पतीसह इतर चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मध्यप्रदेश येथून रविवारी परिवारासह नवविवाहित दाम्पत्य सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी आले होते. एक दिवस येथील एका हॉटेलमध्ये थांबले होते. आज सकाळी त्या सर्वांनी सप्तशृंगी गडावर जाऊन देवीचे दर्शन घेतले. तसेच ह्या भागात अनेक वस्तू खरेदी केल्या, हे नव दाम्पत्य तलावाकडे फिरण्यासाठी गेले होते. त्यांनी त्या ठिकाणी खासगी फोटोग्राफरकडून फोटोही काढून घेतले. त्यानंतर अचानक ते शितकडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी गेले. सुमारे ४०० ते ५०० फूट खोल असलेल्या या कड्यावरून पतीने पत्नीला खाली ढकलून दिल्याचे काही पर्यटकाने बघितले.

या घटनेत पत्नी कविता काळे हिचा मृत्यू झाला. घटनेनंतर पळून जाणाऱ्या पती बाबूलाल काळे याला येथील भाविकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी बाबूलालसह परिवारातील तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा तपास वणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हे पथकासह करत आहेत.

Intro:सप्तशृंगी गड येथील शितकड्यावरून नवविवाहित पत्नीला लोटले,पत्नीचा मृत्यू तर पती पोलिसांच्या ताब्यात..

Body:वणी येथील सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी आलेल्या पतीने पत्नीला शितकड्यावरून नवविवाहित पत्नीला ढकलून दिल्याची धक्कादायक घटना घडली,या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला असून, पतीसह इतर चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे...

अधिक माहिती अशी की मध्यप्रदेश येथून आलेल्या नवविवाहित दांपत्य परिवार सह काल पासून सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी आले होते, ते एक दिवस येथील एका हॉटेल मध्ये थांबले होते...आज सकाळी उठून त्यांनी सप्तशृंगी गडावर जाऊन देवीचे दर्शन घेतले, तसेच ह्या भागात अनेक वस्तू खरेदी केल्या, हे नव दांपत्य तलावाकडे फिरण्यासाठी गेले होते,त्यांनी त्या ठिकाणी खाजगी फोटोग्राफरकडून फोटोही काढून घेतले ,त्यानंतर अचानक ते शितकडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी ते गेले 400 ते 500 फूट खोल असलेल्या ह्या कड्यावरून पतीने पत्नीला खाली ढकलून दिल्याचं काही पर्यटकाने बघितलं, या घटनेत पत्नी कविता काळे हिचा मृत्यू झाला,घटने नंतर पळून जाणाऱ्या पती बाबूलाल काळे ह्याला भाविकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले..पोलीसांनी बाबूलाल सोबत 3 परिवारातील तिघांना ही चौकशी साठी ताब्यात घेतलं आहे..ह्या घटनेचा तपास वणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या सह कर्मचारी करत आहे..

फीड ftp
nsk wife murder

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.