ETV Bharat / state

नाशिक : वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात तापाची साथ

हवामानात अचानक बदल झाल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. नाशिक शहर व जिल्ह्यात व्हायरल तापाने आजारी पडलेल्या रुग्णांच्या संख्येत तब्बल 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

author img

By

Published : Jul 24, 2019, 1:38 AM IST

नाशिक - हवामानात अचानक बदल झाल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. नाशिक शहर व जिल्ह्यात व्हायरल तापाने आजारी पडलेल्या रुग्णांच्या संख्येत तब्बल 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गेल्या आठ दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने वातावरणात अचानक बदलले आहे. कधी ढगाळ वातावरण, तर मध्येच तापमान 37 ते 38 अंशांपर्यंत वाढत असल्याने उष्णता जाणवत आहे. तसेच रात्री आणि पहाटे हवेत गारवा असल्याने याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. यामुळे ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी इ. साथीच्या आजारांच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

वातावरणातील बदलामुळे रुग्णालयात तरुणांची संख्या वाढत आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. तसेच घाबरून न जाता योग्य वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

हवामानात अचानक बदल झाल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. नाशिक शहर व जिल्ह्यात व्हायरल तापाने आजारी पडलेल्या रुग्णांच्या संख्येत तब्बल 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, बाह्यरुग्ण विभागात रोज जवळपास 390 रुग्ण प्रथमोपचारासाठी येत आहेत. सध्या हा आकडा 500 पर्यंत गेला आहे. खाजगी रुग्णालयातही अशीच परिस्थिती असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी डेंग्यूचे रुग्णही आढळले आहेत.

#कोणती काळजी घ्याल..

पावसाळ्यात बाहेरील खाद्यपदार्थ खाऊ नये, ताप आल्यास घरी आराम करावा, गर्दीमध्ये जाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे, ताप, खोकला, अंगदुखी झाल्यास तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत.

Intro:वातावरण बदला मुळे नाशिक जिल्ह्यात तापाची साथ,70 टक्के रुग्ण...

Body:वातावरणात अचानक बदलामुळे याच थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतांना दिसून येत आहेत,नाशिक शहरात व जिल्ह्यात व्हायरल तापाच्या रुग्णांची संख्येत तब्बल 70 टक्के पर्यँत वाढली झाली आहे,

मागील आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने वातावरणात अचानक बदल निर्माण झाले आहे, कधी ढगाळ वातावरण,तर मध्येच तापमान 37 ते 38 अंशा पर्यंत जात असल्याने उकाडा जाणवत आहे, तसेच रात्री आणि पहाटे गारवा जाणवत असल्याने ह्या परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे ..
यामुळे ताप, सर्दी ,खोकला,अंगदुखी आधी साथींच्या आजारांच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढली झाली आहे

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार वातावरण बदलामुळे तरुणांची संख्या वाढत आहे,आजारी असलेल्या रुग्णांनी योग्य काळजी, आराम केल्यास बरे होण्याची शक्यता अधिक आहे, घाबरून न जाता वैद्यकीय सल्ला घ्यावा असे आव्हान देखील डॉक्टरांनी केले आहे,

डेंग्यूच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे सर्वच वयोगटातील आजाराचे रुग्ण वाढत आहे, जिल्हा शासकीय रुग्णालयात देखील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे बाह्यरुग्ण विभागात दैनंदिन 390 रुग्ण प्रथम उपचारासाठी येतात सध्या 500 रुग्ण तपासणीसाठी येत आहे, या रुग्णांमध्ये सर्वाधिक ताप सर्दी खोकला आणि अंगदुखी चे रुग्ण आहेत,अशीच परिस्थिती खाजगी रुग्णालयात देखील आहे,

#काय काळजी ह्याला...
पावसाळ्यात बाहेरील खाद्यपदार्थ खाऊ नये ,ताप आल्यास घरी आराम करावा, गर्दीमध्ये जाणं टाळावं ,पाणी उकळून कोमट झाल्यावर प्यावे, भरपूर पाणी प्यावे, ताप,खोकला,अंगदुखी झाल्यास तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करावेत...

बाईट डॉ राजन अभाळे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.