ETV Bharat / state

विद्रोही मराठी साहित्‍य संमेलनाच्या उद्घाटनाला येणार ग्रेटा थनबर्ग?

author img

By

Published : Feb 8, 2021, 12:35 PM IST

नाशिकमध्ये विद्रोही मराठी साहित्‍य संमेलनाबाबत एक बैठक घेण्यात आली. संमेलनाच्या उद्घाटनाला ग्रेटा थनबर्गला आणण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

Greta Thunberg
ग्रेटा थनबर्ग

नाशिक - स्वीडनची रहिवासी आणि नोबेल पुरस्कार विजेती पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गला नाशिकला होत असलेल्या विद्रोही मराठी साहित्‍य संमेलनात उद्‌घाटक म्‍हणून बोलवण्याचा निर्धार करण्यात आला. विद्रोही मराठी साहित्‍य समितीच्या नाशिकमध्ये आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

साहित्यिकांच्या विचारांना घेऊन आमने-सामने उभे ठाकण्याचा निर्धार -

आयोजित केलेल्या बैठकीमध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या समित्यांबाबत चर्चा करण्यात आली. अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या कालावधी दरम्यानच विद्रोही संमेलन घेऊन प्रस्थापितांसमोर वैचारिक आणि सांस्कृतिक लढा देण्याचे ठरवण्यात आले आहे. संविधानाच्या सन्मानार्थ लोकशाहीर वामनदादा कर्डक, दादासाहेब गायकवाड,बाबूराव बागूल, अरुण काळे आदी साहित्यिकांच्या विचारांना घेऊन आमने-सामने उभे ठाकण्याचा निर्धारही यावेळी केला.

ग्रेटावर दिल्‍ली पोलिसांनी केला गुन्‍हा दाखल -

नाशिकच्या हुतात्‍मा स्‍मारकात संविधान सन्मानार्थ सोळाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्‍या नियोजनासाठी झालेल्‍या बैठकीत उद्घाटकाबाबत चर्चा करण्यात आली. ग्रेटा थनबर्गला नाशिकमध्ये बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रेटा थनबर्गने दिल्‍लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला सोशल मीडियाद्वारे पाठिंबा दिला आहे. मात्र, भावना भडकवण्याचे कारण देत ग्रेटा थनबर्ग विरोधात दिल्‍ली पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.

'एक मूठ धान्य, एक रुपया' संकल्पना -

येत्‍या रविवारी (14 फेब्रुवारी) विद्रोही साहित्‍य संमेलनाच्‍या कार्यालयाचे उद्‌घाटन व विविध समित्‍या, ठरावांबाबत चर्चा केली जाणार आहे. २० ते २५ मार्चदरम्‍यान बाबूराव बागूल यांच्या स्मृतिदिनानिमित्त 'एक मूठ धान्य, एक रुपया' या संकल्पनेवर आधारित निधी संकलनासाठी मोहीम राबवली जाणार आहे. त्यांचे निवासस्थान असलेल्या विहितगाव येथून मशाल ज्योत काढून संमेलनाचे दीपप्रज्वलन त्याच मशालीने करण्याचा निर्णय झाला आहे.

आता झालेल्या बैठकीला नीलेश सोनवणे, वामनदादा गायकवाड, रवींद्र पगारे, ताराचंद मोतमल, दीपाली वाघ, अश्पाक कुरेशी, सदाशिव गनगे, अर्जुन बागूल, प्रा. प्रतिमा परदेशी, गणेश उन्हवणे, किशोर ढमाले, राजू देसले, नितीन रोठे-पाटील, मन्साराम पवार, प्रभाकर धात्रक, चंद्रकांत भालेराव, व्ही. टी. जाधव, सुभाष काकुस्ते आदी उपस्‍थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.