ETV Bharat / state

Nashik Rural Police : नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या सुरक्षा व्यवस्थेला लाभले वाहनांचे पाठबळ - पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस दलास (Nashik Rural Police) जिल्हा नियोजन समितीतून (District Planning Committee) 23 चारचाकी व 80 दुचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.यामुळे नाशिक पोलीस दलाच्या सुरक्षा व्यवस्थेला वाहनांचे पाठबळ (Vehicle support for security system) लाभले आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांनी केले आहे, पोलीस अधिक्षक कार्यालयात अयोजित वाहन वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

Nashik Rural Police :
नाशिक ग्रामीण पोलीस
author img

By

Published : Feb 27, 2022, 1:46 PM IST

नाशिक: पालकमंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले की, जिल्ह्यात प्रथमत: जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उपलब्ध करून देण्यात आलेली बहुतांश वाहने ही महिला सुरक्षा निर्भया पथकांसाठी महिला अधिकारी यांना सूपूर्द करण्यात आली आहेत. डायल 112 ही कार्यप्रणाली सुद्धा लवकरच कार्यान्वित होत असून, या प्रणालीत मध्यवर्ती वॉर रूमच्या नियंत्रणाखाली ही सर्व वाहने असणार आहेत. प्रत्येक गाडीचे लोकेशन वॉर रूमला या प्रणालीच्या माध्यमातून उपलब्ध होणार असून, घटनास्थळी जेथे दुर्घटना घडली असेल किंवा नागरिकांना पोलीसांची मदत हवी असेल अशा ठिकाणी विनाविलंब सिग्नलद्वारे यंत्रणेला सूचना मिळून पोलीसांची मदत वेळेत उपलब्ध होणार आहे.यामुळे महिला सुरक्षा व्यवस्थेत चोखपणे काम करता येणे शक्य होणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात चार जणांना वाहनांचे वितरण पालकमंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

डायल 122 प्रणाली
यावेळी महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली (MERS) कक्षाची पालकमंत्री यांची भेट पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पोलीस अधिक्षक कार्यालय येथील आपत्कालिन प्रतिसाद प्रणाली (MERS) कक्षास भेट दिली. या कक्षात डायल 112 कार्यप्रणाली संगणकप्रणालीद्वारे कसे चालते याची पाहणी केली.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेंकर, पोलीस निरीक्षक विशेष शाखा अकबर पटेल, पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा हेमंत पाटील उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.