नाशिक - येवला येथे देवांग कोष्टी समाजातर्फे श्री चौंण्डेश्वरी मातेचा वसंत पंचमी महोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी महिषासुर वधाचा सजीव देखावा आणि महिलांच्या झांज पथकाने उपस्थितांचे लक्ष वेधले.
वसंत पंचमी महोत्सवानिमित्त येवल्यातील कोष्टी समाजातर्फे वसंत पंचमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने चौंण्डेश्वरी मातेची सकाळी मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा करून शहरातील मुख्य रस्त्यावरून मातेची पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शहरात विविध समाजांकडून आणि भाविकांकडून मिरवणुकीचे स्वागत करून पालखीचे पूजन करण्यात आले.
हेही वाचा - नाशिक विभागाची आज आढावा बैठक; मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची उपस्थिती
या मिरवणुकीत समाजातील सर्व महिलांनी भगवे फेटे परिधान करून झांज सादर केली. तसेच वसंत पंचमी निमित्ताने मिरवणुकीत महिषासुर वधाचा सजीव देखावा सादर करण्यात आला होता. या वसंत पंचमी महोत्सवास राज्याच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण असतात.
हेही वाचा - चालकांनी बस सावकाश चालवावी, नागरिकांची मागणी