नाशिक: कोरोना लसीकरनाच्या यादीत राज्यात नाशिक जिल्हा १९ व्या स्थानी आला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ होत आहे. ७० लाख ४३ हजार लोकसंख्या असलेल्या नाशिक जिल्ह्यात १८ वर्षांवरील लसीकरणासाठी पात्र लोकांची संख्या तब्बल ५१ लाख ७५ हजार इतकी आहे मात्र यापैकी ४० लाख ४१ हजार नागरिकांनी पाहिला डोस घेतला. तर दुसरा डोस केवळ २० लाख ३८ हजार नागरिकांनी घेतला आहे.
आकडेवारी काय सांगते
सप्टेंबर - पहिला डोस ५२ % तर दुसरा डोस १९ %
ऑक्टोंबर - पहिला डोस ६७ % तर दुसरा डोस २५ %
नोव्हेंबर - पहिला डोस ७३ % तर दुसरा डोस ३० %
तर डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पहिला डोस ८० % तर दुसरा डोस ४० % इतक्या लोकांनी घेतला
लसीकरणाच्या यादीत १९ व्या क्रमांकावर
लसीकरणचा आलेख वाढता असला तरी लोकसंख्येच्या तुलनेत तो कमी असल्याने राज्यात नाशिक जिल्हा लसीकरणाच्या यादीत १९ व्या क्रमांकावर फेकला गेल्याने प्रशासणाच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक आहे. त्यामुळे आता नाशिक जिल्ह्यातील सर्वच खाजगी आणि सरकारी कार्यलयात येणाऱ्या नागरिकांना २ डोस असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.२३ डिसेंबर पासून या नव्या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे. प्रशासना बरोबर नागरिकांची देखील जबाबदारी असल्याने नागरिकांनी जास्तीत जास्त लसीकरण करून घ्यावे असे आवाहान भुजबळ यांनी केले आहे.
'नो वॅक्सिंग नो एन्ट्री'- पालिका आयुक्तांचे आदेश...
नाशिक शहरात पहिला डोस घेतलेल्याची टक्केवारी ही ९० टक्के आहे. मात्र दुसरा डोस घेण्यासाठी पात्र असूनही अनेकांनी दुसरा डोस घेतलेला नाही अशा व्यक्तींवर आता कारवाई होणार आहे. चित्रपट गृहे, रेशन दुकान व खासगी आस्थपणांमध्ये दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल. त्यास पात्र नसाल तर तुम्हला वस्तू घेता येणार नाही, हा नियम दुकानदारांनी मोडला तर त्यांच्यावर कारवाई होईल. यासाठी विशेष पथके तयार करण्यात येणार आहेत. हा नियम २३ डिसेंम्बर पासून लागू होणार आहे. तत्पुर्वी ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर घ्यावा असे मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले आहे.
मालेगाव शहरात सर्वाधिक कमी प्रमाण
नाशिक जिल्ह्यात तीन मोठे विभाग आहेत.मालेगाव पालिका क्षेत्रातील मुस्लिम बहुल भागात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. या भागात लसीकरण वाढविण्यासाठी प्रशासनाने मोलवींची देखील मदत घेतली आहे.तर आदिवासी बहुल भागात सामाजिक संस्था प्रशासनाला मदत करत आहेत, मालेगाव सह येवला,बागलाण,सुरगाणा आणि नांदगाव या चार तालुक्यात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यतील काही तालुक्यात ही परिस्तिती असली तरी नाशिक तालुक्यात १०० % लसीकरण झाले आहे.