नाशिक : आज प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. सुरवातीला भारत देश आधुनिक शस्त्र इतर देशातून आयत करत होता. मात्र 2014 मोदींच्या संकल्पनेतून मेक इन इंडिया धर्तीवर अनेक अत्याधुनिक शस्त्र भारतात तयार होत आहे, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे प्रदर्शनाच्या उदघाटन सोहळ्याप्रसंगी बोलत होते. नागरिकांना भारतीय सैन्य दलाच्या ताकदीचे दर्शन घडावे, यासाठी महाराष्ट्रात पहिल्यांदाच नागरिक वस्तीत सर्वात मोठे शस्त्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे. यानिमित्ताने नागरिकांना तोफखान्याच्या शक्तीशाली आधुनिक तोफांसह, बंदुका, रडार यांच्यासह घोड्यांचे प्रात्यक्षिके दाखवले जाणार आहे. यासोबत लष्करी बँड पथकाचाही अनुभव घेता येणार आहे.
तोफा बघण्याची संधी : या प्रदर्शनात भारतीय सैन्य दलाची ताकद असलेली कारगिल युद्धात मोलाचे योगदान देणाऱ्या बोफोर्स तोफा, आधुनिक स्वदेशी धनुष्य, हलकी होवित्झर (एम-777), इंडियन फिल्ड सॉल्टम (155 एम.एम), हलकी तोफ (105 एमएम), उखळी तोफ (130 एम.एम), मोर्टार (120 एम.एम), मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर (बीएम 21), लोरोस रडार सिस्टीमसह तब्बल 19 तोफा बघण्याची नाशिकरांना संधी उपलब्ध झाली आहे.
विशेष प्रात्याक्षिके : विशेष म्हणजे यावेळी बॅन्ड पथकाचे प्रमुख कर्नल सुनीलचंद्रन यांच्या नेतृत्वाखाली बँड पथक विविध गीतगायन-वादन सादर केले जात आहे. तसेच अश्वदलाचे प्रमुख सुभेदार गौरव मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली पथक घोडदौडीचे प्रात्यक्षिके सादर केली. यात स्टार, मॅक्स, तुफान, शायनिंग या घोड्यांसह साहिबा हि घोडी सामील झाली आहे. सुभेदार कैलास दळवी यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा चमू जीम्नेक्स्टिकची प्रात्यक्षिके सादर केली. हे प्रदर्शन 18 आणि 19 तारखेला सकाळी 9 ते रात्री 9.30 वाजेपर्यंत नागरिकांसाठी मोफत खुले आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सैन्य दलाच्या वतीने करण्यात आले आहे.
स्टॉलवर माहिती : अग्नीवर भरती प्रक्रिये संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता देखील याठिकाणी स्वतंत्र स्टॉलची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच माजी सैनिक व विर पत्नी यांना काही अडचण असल्यास त्यांच्या तक्रार दूर करण्यासाठी या प्रदर्शनात स्टॉल लावण्यात आले आहेत. येथे त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात येणार आहे. विदेशी बनावटीची बोफर्स तोफपेक्षा अधिक सक्षम असलेली धनुष्य तोफ आपण बनवतो.
सैन्य भरतीत येण्यास आकर्षण : आता भारत हा डिफेन्सर सामग्री निर्यात करत आहे. नाशिकच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सैन्य भरतीत येण्यास आकर्षण निर्माण होणार आहे. आपल्या देशात सामग्री निर्माण होण्यामुळे रोजगार होणार आहे. नाशिकमध्ये डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगला मोठा वाव मिळणार आहे. आता भारत देश संरक्षणात अधिक सक्षम झाला आहे. कोणी वाकड्या नजरेने आपल्या देशाकडे बघू शकत नाही, एवढी आपली ताकद वाढली आहे असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.