नाशिक- येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज (गुरुवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिक विभागाची आढावा बैठक होत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, दादा भुसे, यांच्यासह राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे, अब्दुल सत्तार तसेत आमदार, खासदार, विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा- थेट सरपंच निवड रद्द; आता सदस्यच निवडणार सरपंच
यात सुरुवातीला धुळे जिल्ह्याचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर जळगाव, नंदुरबार, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीत जिल्ह्यातील नियोजनाबाबत आणि निधीबाबत महत्वपूर्ण चर्चा होणार आहे. सोबतच अनेक कामाचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत. काही नवीन कामांना या बैठकीत मंजूरी देण्यात येणार आहे.
जिल्ह्याधिकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांव्यतीरिक्त इतरांनी प्रवेश नाकारण्यात आला आहे. मुख्यमंत्री आणि इतर मंत्री येणार असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.