नाशिक : गंगापूर गावातील सोमेश्वर धबधबा ( Someshwar Waterfall Nashik ) पाहण्यासाठी गेलेले दोन मित्र गोदावरी नदीपात्रात ( Godavari river basin Nashik ) बुडाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली ( Two Youths Drowned In Nashik ) आहे. देवळाली कॅम्प परिसरातील ( Deolali Camp Nashik ) चौघेजण सोमेश्वर मंदिर परिसरात फिरण्यासाठी आले होते. यावेळी धबधबा परिसरात फिरत असताना चौघा जणांपैकी एक जण पाण्यात पोहण्यासाठी उतरला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. बुडणाऱ्या मित्राला वाचवण्यासाठी दुसऱ्या मित्राने पाण्यात उडी मारली. हे दोघेही पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले आहेत. या दोघांचे शोधकार्य सध्या सुरू असून घटनास्थळी शोध घेतला जात आहे.
तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतरही युवकांचा ठावठिकाणा नाही : अद्यापपर्यंत दोघाही जणांचा शोध लागू शकलेला नाहीये. धर्मेंद्र मेहेर आणि आकाश पचोरी ही दोघी मुले पाण्यात बुडाली असून, त्यांचे शोधकार्य सुरू आहे. दरम्यान दोनच दिवसांपूर्वी गंगा घाटावरील गांधी तलावात दोघा जणांचा बुडून मृत्यू झाली मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आज सोमेश्वर धबधबा येथे दोघेजण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गेल्या सहा दिवसापासून गोदावरी नदीत गंगापूर धरणातून 600 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उन्हाचा तडाखा बसत असल्याने अनेकजण नदीपात्रात आंघोळीसाठी गर्दी करू लागली आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक जीव रक्षकांच्या मदतीने तातडीने शोधकार्य सुरु करण्यात आले. पण या दोघांचा तपास काही लागला नाही. चौघे देवळाली आर्टिलरी येथील रहिवाशी असून, ते सोमेश्वर धबधबा फिरायला आले होते.
हेही वाचा : फोटोच्या नादात तरुणी पाय घसरून कुंडमळ्यात पडल्या; एकीचा मृत्यू, एकीला वाचवण्यात यश