ETV Bharat / state

Nashik Two Wheeler Accident : ग्रामपंचायतीचा निकाल येण्याअगोदर उमेदवाराचा अपघाती मृत्यू - नाशिक अपघातात दोघांचा मृत्यू

गाडीचा ताबा सुटल्याने नाशिक येथे अपघात झाला ( Nashik Two Wheeler Accident ) आहे. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Nashik Two Wheeler Accident
Nashik Two Wheeler Accident
author img

By

Published : Jan 16, 2022, 3:55 PM IST

नाशिक - नाशिकमधील सुरगाणा येथे ताबा सुटल्याने गाडी झाडावर धडकल्याने अपघात झाला ( Nashik Two Wheeler Accident ) आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर ( Nashik Two Wheeler Accident two Dead ) जखमी आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पंकज जयराम पवार ( वय 23, रा. बोरपाडा कोटंबी ह.मु. सुरगाणा ) भोला हिरामण बागुल ( वय 22, रा. साबरदरा ह.मु. सुरगाणा ), अशी मृत झालेल्यांची नावे आहेत. तर राहुल गोपाळ चौधरी ( वय 23, रा. उबरपाडा ) याच्यावर उपचार सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल चौधरी, भोला बागुल आणि पंकज पवार हे वणीकडून सुरगाणाकडे सुझुकी आर यादुचाकीने जात होते. घागबारी फाट्याच्या वळणावर आल्यानंतर दुचाकीवरचा ताबा सुटल्याने एका झाडावर दुचाकी आदळून पंचवीस ते तीस फुट खोल खड्ड्यात पडली. यामध्ये तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, पंकज पवार, भोला बागुल दोघांचा मृत्यू झाला. तर राहुल चौधरी हा गंभीर जखमी झाला असून, त्याला पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

उमेदवाराचा मृत्यू

पंकज हा अनाथ होता. त्याचे परिस्थितीवर मात करत इंजिनिअरिंगच्या तिस-या वर्षात नाशिक येथील महाविद्यालयात शिक्षण सुरु होते. त्याचा सांभाळ सुरगाणा गावाचे दिवंगत पोलिस पाटील रामभाऊ केला होता. नुकत्याच झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 12 मध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने त्याने निवडणूक लढविली होती. त्याचा निकाल 19 जानेवारी रोजी लागणार होता.

हेही वाचा - Aparna Yadav Join BJP : मुलायमसिंह यादवांची सून भाजपात प्रवेश करण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.