ETV Bharat / state

मालेगावातील दुचाकी चोर जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

वाढत्या दुचाकी चोरीच्या गुन्हयांना आळा बसविण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई सुरू असून यात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.

मालेगाव शहर
मालेगावातील मोटर सायकल चोरणारे गुन्हेगार जेरबंद
author img

By

Published : Nov 29, 2019, 5:39 PM IST

मालेगाव- शहरातील दोन दुचाकी चोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. जिल्हयातील वाढत्या दुचाकी चोरीच्या गुन्हयांना आळा बसविण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई सुरू आहे.

२८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावर मालेगाव तालुका परिसरात गस्त घालत असताना मिळालेल्या माहितीनुसार सवंदगाव फाटा परिसरात काही संशयित कमी किंमतीत दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर सवंदगाव फाटा परिसरात सापळा रचून अरोपी अब्दुल सलीम अब्दुल सलाम, म्हाळदे शिवार, मालेगाव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील हिरो स्प्लेंडर प्लस मोटर सायकलच्या कागदपत्रांबाबत विचारपुस केली असता त्याने ही गाडी मालेगाव शहरातील आंबेडकर पुतळा परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीकडून चोरीच्या आणखी दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. अधिक चौकशी केली असता त्याने साथीदार फरान अंजुम अब्दुल गफार, रा. नवरंग कॉलनी, मालेगाव याच्यासह मालेगाव आणि येवला शहरात चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपी फरान अंजुम याला मालेगाव शहरातील यल्लमा पुल परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. या गुन्ह्याच्या तपासात आरोपींकडून दुचाकी चोरीचे अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Intro:मालेगाव शहरातील दोन मोटर सायकल चोरांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने ताब्यात घेतले असुन त्यांच्या ताब्यातून चोरीच्या पाच मोटर सायकली हस्तगत करण्यात आलेल्या आहे. जिल्हयातील वाढत्या मोटर सायकल चोरीचे गुन्हयांना आळा बसविण्यासाठी मा.पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाची कारवाई सुरू आहे.Body:दिनांक २८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीचे सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व कर्मचारी मुंबई आग्रा महामार्गावर मालेगाव तालुका परिसरात गस्त घालत असताना त्याना खब-यामार्फत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सवंदगाव फाटा परिसरात काही संशयीत कमी किंमतीचे दरात मोटर सायकल विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर सवंदगाव फाटा परिसरात सापळा रचून अरोपी अब्दुल सलीम अब्दुल सलाम, रा. नांदेडी हायस्कूल जवळ, म्हाळदे शिवार, मालेगाव यास ताब्यात घेतले. त्याचे कब्जातील हिरो स्प्लेंडर प्लस मोटर सायकल
कागदपत्रांबाबत विचारपुस केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली, त्यास पोलीसी खाक्या दाखविताच त्याने सदर मोटर सायकल ही मालेगाव शहरातील आंबेडकर पुतळा परिसरातुन चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपी अब्दुल सलीम याचे कब्जातुन चोरीच्या आणखी दोन मोटर सायकल हस्तगत करण्यात आल्या, त्यास अधिक चौकशी केली असता त्याने साथीदार फरान अंजुम अब्दुल गफार, रा. नवरंग कॉलनी, मालेगाव याचेसह मालेगावसह येवला शहरात मोटर सायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे.आरोपी फरान अंजुम यास मालेगाव शहरातील यल्लमा पुल परिसरातुन ताब्यात घेण्यात आले आहे.वरील दोन्ही आरोपींचे कब्जातुन चोरीच्या तीन हिरो स्प्लेंडर प्लस, एक पॅशन प्रो, एक हिरो एच.एफ.
डिलक्स अशा एकुण पाच मोटर सायकल एक लाख ३० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत
करण्यात आला आहे. सदर चोरीचे मोटर सायकल बाबत मालेगाव शहर, मालेगाव किल्ला व येवला शहर
पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असुन मोटर सायकल चोरीचे एकुण तीन गुन्हे उघडकीस आलेले आहे. वरील
गुन्हयांचे तपासात सदर आरोपींकडुन मोटर सायकल चोरीचे अजुन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
आहे. मालेगाव पोलिस पथकाला मोटर सायकल चोर पकडण्यास यश आले आहेConclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.