ETV Bharat / state

नाशिकमध्ये सयामी जुळ्या बाळांचा जन्म; जिल्ह्यातील पहिलीच घटना

जिल्हा शासकीय रुग्णालयात जुळ्या बाळांचा जन्म झाला आहे. या जुळ्या बाळांना जन्म देणाऱ्या महिलेचे नाव मंदा दिलीप वारडे (वय 30) असून ही सयामी जुळ्या बाळांचा जन्म देण्याची जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.

सयामी जुळ्या बालकांची छायाचित्रे
author img

By

Published : Jun 11, 2019, 7:10 PM IST

नाशिक- जिल्हा शासकीय रुग्णालयात चार हात-पाय, दोन तोंडे मात्र पोट आणि छातीचा भाग एक असलेल्या सयामी जुळ्या बाळांचा जन्म झाला आहे. या जुळ्या बाळांना जन्म देणाऱ्या महिलेचे नाव मंदा दिलीप वारडे (वय 30) असे आहे. नाशिक जिल्ह्यात सयामी जुळे असलेल्या बाळांचा जन्म झाल्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे.

सयामी जुळ्या बाळांबद्दल माहिती सांगतांना डॉक्टर

अत्यंत आव्हानात्मक व गुंतागुंतीची ही प्रसुती होती. मात्र, जिल्हा रुग्णालयातील तज्ञांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने ही प्रसुती करुण यश मिळवले आहे. जन्मलेल्या सयामी जुळ्यांच्या लिंगाबाबत अद्याप कुठलेही निदान होऊ शकले नाही. मात्र मातेची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. बालकांना अतिदक्षता विभागात उपचारासाठी ठेवले आहे.

मातेच्या गर्भाशयात एकाच बीजांडापासून वेगळे होऊन किंवा दोन विभिन्न बिजांडांच्या शुक्राणूच्या मिलनामुळे दोन गर्भास जुळे म्हटले जाते. अशा गर्भातून जन्मलेला नवजात शिशू हे दोन्ही मुले, मुली किंवा एक मुलगाही असू शकतो. मात्र मंदा यांना झालेल्या सयामी जुळ्या बाळांचे लिंग अद्याप डॉक्टरांना समजू शकले नाही. मंदा यांना सयामी जुळ्या बाळांव्यतिरिक्त दोन मुली सुद्धा आहे. नवजात बालकांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

गर्भारपणात मातेच्या काही सोनोग्राफी चाचण्या करायच्या असतात. त्या न केल्याने जुळे मुले होणार असल्याचे लक्षात येत नाही. आता या जुळ्या बाळांपैकी एक मुलगा असल्याचे लक्षात आले आहे. तर दुसरा मुलगी किंवा मुलगा असल्याचे समजू शकत नसून लवकर या बालकांवर डॉक्टर रिना राठी मोफत शस्त्रक्रिया करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Intro:जिल्हा शासकीय रुग्णालयात चार हात पाय ,दोन तोंडे मात्र पोट आणि छातीचा भाग एक असलेल्या सयामी जुळ्यांचा जन्म झाला आहे अत्यंत आव्हानात्मक व गुंतागुंतीची प्रस्तुती जिल्हा रुग्णालयातील तज्ञांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने करण्यात यश मिळविले जन्मलेल्या सयामी जुळ्यांचे लिंगाबाबत कुठलेही निदान अद्याप होऊ शकले नाही मात्र मातेची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितलय..

Body:सुरगाणा तालुक्यातील बाहे येथील मंदा दिलीप वारडे वय 30 या महिलेने या जुळ्यांना जन्म दिला आहे मातेची प्रकृती स्थिर असून बालकांना एका खाजगी रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी ठेवले आहे मातेच्या गर्भाशयात एकाच बीजांडा यापासून वेगळे होऊन किंवा दोन विभिन्न बिजांडांच्या शुक्राणूच्या मिलनामुळे दोन गर्भास जुळे म्हटले जाते अशा गर्भातून जन्मलेल्या नवजात शिशु हे दोन्ही मुले ,मुली किंवा एक मुलगा मुलगी असू शकतात मात्र या जुळ्याचे लिंग अद्याप डाँ. समजलेले नाही मंदा यांना आधी दोन मुली आहेत बालकांना नवजात बालकांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून नाशिक जिल्ह्यात सयामी जुळे असलेल्यांचा जन्म झाल्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे

Conclusion:गर्भ पणात मातेच्या काही सोनोग्राफी करायच्या असतात त्या न केल्याने जुळे मुले होणार आहे हे लक्षात आले नाही अता हे बालके एक मुलगा आहे हे लक्षात आलं आहे तर दुसरा मुलगी किंवा मुलगा हे समजू शकते नसून लवकर या बालकांवर डॉक्टर रिना राठी मोफत शस्त्रक्रिया करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.