ETV Bharat / state

नाशिक येथे 'मेडिकल टुरिझम हब' निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार - पालकमंत्री छगन भुजबळ

देवळाली येथील ट्रु केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे 100 बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरच्या उद्घाटन पालकमंत्री भुजबळ याच्या हस्ते करण्यात आले.

true-care-multispecialty-hospital-inauguration-by-chhagan-bhujbal-in-nashik
नाशिक येथे 'मेडिकल टुरिझम हब' निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार - पालकमंत्री छगन भुजबळ
author img

By

Published : Oct 9, 2020, 5:22 PM IST

नाशिक - पर्यटन, कृषी, चांगल्या दर्जाच्या शैक्षणिक सुविधेबरोबरच आता चांगल्या आरोग्य सुविधेसाठीही नाशिक जिल्हा संपूर्ण राज्यात ओळखला जातो. भविष्यात उत्तम व वाजवी आरोग्य सुविधांसाठी जगातून लोकांनी नाशिकला येणे पसंत करावे, यासाठी ‘मेडिकल टुरिझम हब’ निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

देवळाली येथील ट्रु केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे 100 बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री भुजबळ बोलत होते. या हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या उपचारांबरोबर इतरही आजारांवर उपचार केले जाणार असल्याने स्थानिक नागरिकांना याचा लाभ होणार आहे. या रुग्णालयात कोरोनासाठी लागणाऱ्या सर्व सुविधांची उभारण्यात करण्यात आली आहे. या कोविड केअर सेंटरमध्ये 50 आयसीयू बेड्सची व्यवस्था आहे, त्याबरोबरच पुरूषांसाठी 30 व महिलांसाठी 20 जनरल बेड्स व्यवस्था करण्यात आली असून अद्यावत लॅब, सिटी स्कॅनसह 24 तास मेडिकलची सुविधा देण्यात आली आहे.

ट्रु केअर रुग्णालयानेही सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून वाजवी दरात रुग्णांवर उपचार करावे, अशी अपेक्षाही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केली आहे. ठक्कर डोम आणि पोलिसांसाठी तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमुळे इतर रुग्णालयांवर पडणारा ताण कमी होण्यास मदत झाली आहे. कोरोनासारख्या कठीण काळातही खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी सुद्धा कुठलाही विचार न करता सेवा दिली आहे. कोरानाकाळात डॉक्टरांनी एखाद्या देवदूतांप्रमाणे काम केले असून ही अत्यंत कौतुकास्पद बाब असल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

नाशिकचा मृत्यूदर कमी-

जास्तीत जास्त तपासणी मोहिम राबवून कारोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण शोधण्यात आरोग्य विभागाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्याचा परिपाक म्हणून पॉझिटीव्ह रुग्णांवर तात्काळ उपचार झाले आणि राज्याच्या तुलनेत नाशिक जिल्ह्याचा मृत्युदर कमी ठेवण्यात आपल्याला यश मिळाले असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.