नाशिक - शहरात जवळील वाडीवऱ्हे येथील व्हिटीसी कंपनी जवळ ट्रक आणि आयशरमध्ये अपघात झाला. या अपघातात तीन जण ठार झाले असून एक जण गंभीर झाला आहे. या बाबत वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असलेला mh 15 Av 2355 हा तांदळाने भरलेला ट्रक अचानक डिव्हायडर तोडून मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या आयशर वर जाऊन आदळला. यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्याला नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात ट्रक आणि आयशर गाडीचा चक्काचूर झाला आहे. अपघाताचा आवाज अर्धा किलोमीटर पर्यंत नागरिकांना ऐकू आल्याचे सांगण्यात आले.
नाशिक - मुंबई महामार्गावर अपघाताची संख्या वाढली आहे. कोरोना मुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे सर्वच महामार्गा सोबत नाशिक मुंबई राष्ट्रीय महामार्ग वर देखील अपघाताचे प्रमाण वाढले होते. मात्र, अनलॉकनतंर पुन्हा एकदा अपघाताच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
अपघाताची कारणे |
मर्यादे पेक्षा अति वेगाने वाहन चालवल्या मुळे वाहनांवर नियंत्रण राहत नाही. |
नाशिक हुन भाजी,फळे यांची वाहतूक करणारे ट्रक जोरात वाहने चालवतात |
दारू पिऊन वाहन चालवणे |
रस्त्यात अनेक बायपास असल्यामुळे अचानक वाहने,प्राणी समोर येऊन अपघात होतात. |
रस्त्यांना पडलेले खड्डे-वाहतुकीच्या नियमा बाबतच्या फलकांचा अभाव. |