ETV Bharat / state

त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी 4 एप्रिलपर्यंत बंद - nashik district news

नाशिक जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्यामुळे त्र्यंबकेश्वर येथील मंदिर उद्यापासून (28 मार्च) ते चार एप्रिलपर्यंत बंद करण्याचा निर्णय मंदिर व्यवस्थापन समितीने घेतला आहे.

nashik
त्र्यंबकेश्वर मंदिर
author img

By

Published : Mar 27, 2021, 10:16 PM IST

Updated : Mar 27, 2021, 10:38 PM IST

नाशिक - जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्यामुळे त्र्यंबकेश्वर येथील मंदिर उद्यापासून (28 मार्च) ते चार एप्रिलपर्यंत बंद करण्याचा निर्णय मंदिर व्यवस्थापन समितीने घेतला आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी 4 एप्रिलपर्यंत बंद

मंदिरातील पूजाविधी राहणार सुरू

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाझत अल्यामुळे जिल्हा प्रशासनाने 8 मार्चपासून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कडक पाउले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने सातत्याने जिल्हा प्रशासन स्तरावर ती कारवाई करत आहे. यामुळेच आता प्रशासनाच्या वतीने निर्बंध अधिक गंभीरतेने कारवाई करत गर्दी होत असलेल्या ठिकाणी कारवाई करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. त्यामुळेच त्र्यंबकेश्वर देवस्थान समितीच्या वतीने उद्यापासून चार एप्रिलपर्यंत त्र्यंबकेश्वर येथील मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची अधिकृत माहिती त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे. मंदिर बंद असले तरी रोजच्या नियमित पूजा विधी मंदिरातील केल्या जानार आहेत. देशभरातून मोठ्या संख्येने त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये भाविक येत असतात खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांसाठी मंदिर उद्यापासून 4 एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याचे त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी संगीत आहे.

जिल्ह्यात सद्यस्थितीत 20 हजार 905 रुग्णांवर उपचार सुरू

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज (दि. 27 मार्च) प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 1 लाख 40 हजार 804 कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 20 हजार 905 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत 2 हजार 283 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात 86 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

हेही वाचा - संजय राऊतांना शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसची जास्त काळजी - प्रवीण दरेकर

Last Updated : Mar 27, 2021, 10:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.