ETV Bharat / state

Women Struggle For Water In Nashik District : आदिवासी भागातील महिलांचा पाण्यासाठी संघर्ष; पहा ही जीवघेणी कसरत - नाशिक जिल्ह्यात महिलांचा पाण्यासाठी संघर्ष

डोक्यावर हंडा घेऊन 50 ते 60 फूट खोल डोह ओलांडणाऱ्या महिलांची जीवघेणी कसरत आहे. (Women Struggle For Water In Nashik District) पाण्यासाठी डोक्यावर पाण्याने भरलेला हंडा घेऊन जीवावर उदार होऊन केवळ एका लाकडी लाकडावरून चालत खोल दरी ओलांडून या महिलांना दररोज पाणी आणावं लागतं आहे. (women struggle for water in Nashik district) गेल्या 15 ते 20 वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेंद्रीपाडामध्ये हंडाभर पाण्यासाठी या महिलांना ही जिवघेणी कसरत करावी लागत आहे.

आदिवासी भागातील महिलांचा पाण्यासाठी संघर्ष

author img

By

Published : Jan 5, 2022, 10:58 AM IST

नाशिक - हंडाभर पाण्यासाठी आजही आदिवासी भागातील महिलांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. यामध्ये जिवघेणा प्रवास करावा लागत आहे. अक्षरश: दरी पार करताना एका लाकडावरून अलिकडून-पलिकडे जाण्याचा प्रवास करावा लागत आहे. (women struggle for water in Nashik district) नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर (Women Struggle For Water In Nashik District) तालुक्यातील शेंद्रीपाडामध्ये हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आदिवासी भागातील महिलांना आजही पाण्यासाठी किती पायपीट आणि जीवघेणी कसरत करावी लागते हे स्पष्ट झाला आहे.

शुद्ध पाण्यासाठी डोंबारी पेक्षाही महिलांची अवघड कसरत

डोक्यावर हंडा घेऊन 50 ते 60 फूट खोल डोह ओलांडणाऱ्या महिलांची जीवघेणी कसरत आहे. पाण्यासाठी डोक्यावर पाण्याने भरलेला हंडा घेऊन जीवावर उदार होऊन केवळ एका लाकडी लाकडावरून चालत खोल दरी ओलांडून या महिलांना दररोज पाणी आणावं लागतं आहे. गेल्या 15 ते 20 वर्षांपासून या महिला अशा प्रकारे पिण्यासाठी पाणी आणत आहेत. अनेकवेळा तक्रार करूनही आमच्याकडे कोणी लक्ष देत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही शेंद्रीचा पाड्यावर विहीर किंवा पाण्याची व्यवस्था नाहीये. (Women Struggle For Water In Nashik District) त्यामुळे ही जीवघेणी कसरत त्यांच्या नशिबी आली आहे. आजवर आदीवशी वाड्या वस्त्यांच्या नावावर अनेक योजना राबवल्या गेल्या आहेत. मात्र, त्या केवळ कागदावरच त्र्यंबकेश्वर मधील खरशेत या ग्रामपंचायत हद्दीतील शेंद्रीपाड्यावर राहणाऱ्या या महिला शुद्धपिण्याच्या पाण्यासाठी आजही झऱ्यांचा सहारा घेत आहेत. त्यासाठी नदी ओलांडावी लागते. तर दोन वर्षांपूर्वी एका गरोदर महिलेला वेळीच उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकवेळा शिक्षक आणि विद्यार्थी बांबूवरून तोल जाऊन पडले असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले आहे.

आदिवासी महिलांची ही जीवघेणी फरपट अंगावर काटा आणणारी

शेंद्रीचा पाडा गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. ना इथे वीज आली ना रस्ते. त्यामुळे आजही इथले आदिवासी बांधव विकासापासून वंचित आहेत. विशेष म्हणजे शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांना या संदर्भात लक्ष घालून पाठपुरावा करण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळाळी आहे. पाण्यासाठी इथल्या महिलांना करावी लागणारी जीवघेणी कसरत पहिली तर कुणाच्याही अंगावर काटा उभा राहतो. आदिवासी भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जलजीवन मिशन योजना मोठा गाजावाजा करत सुरू केली. मात्र, ती योजना या महिलांपर्यंत कधी पोहचेलीय का ? असा प्रश्न हे दृश्य बघितल्यानंतर उपस्थित होत आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील आदिवासी वाड्या-वस्त्यांपर्यंत पाण्यासारखी पायाभूत सुविधा कधी पोहचणार? असा प्रश्नही कायम आहे.

हेही वाचा - Sindhutai Sapkal Passes Away : अनाथांच्या मायेनं व्यापलेलं ममत्व अनंताच्या प्रवासाला

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.