ETV Bharat / state

पाण्याचा बळी.. नाशिकमध्ये खाणीत बुडून पती-पत्नीसह पुतण्याचा मृत्यू

पाणीटंचाईमुळे सैय्यद पिंपरीतील अनेक महिला या खाणीमध्ये कपडे भांडी धुण्यासाठी येत असतात.

author img

By

Published : Apr 5, 2019, 8:03 AM IST

Updated : Apr 5, 2019, 8:22 AM IST

नाशिकमध्ये खाणीत बुडून पती-पत्नीसह पुतण्याचा मृत्यू

नाशिक - नाशिकच्या सय्यद पिंपरी गावतील ग्रामपंचायतीच्या खाणीत पडून पती,पत्नीसह पुतण्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी घडली आहे. पाण्यासाठी नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. या घटनेमुळे पिंपरी गावात हळहळ व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील अनेक भागात सध्या भीषण पाणीटंचाई आहे. पाण्यासाठी नागरिकांनी वणवण भटकावे लागत आहे. पाणीटंचाईमुळे सैय्यद पिंपरीतील अनेक महिला या खाणीमध्ये कपडे भांडी धुण्यासाठी येत असतात. गावातील सविता वारडे यादेखील पती आणि पुतण्यासोबत भांडे धुण्यासाठी खाणीत आल्या होत्या. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या १५ फूट खोल पाण्यात पडल्या. त्यांना वाचवण्यासाठी पती नंदू वराडे हे पाण्यात उडी मारली, मात्र ते देखील बुडत असल्याचे पाहून पुतण्या केशव वराडे हा सुद्धा पाण्यात उडी मारला. मात्र त्यालाही पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. गावकऱ्यांच्या मदतीने त्यांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.

या तिघांच्या मृतदेहावर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर हे मृतदेह त्यांच्या नातेवाईकच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेने सैय्यद पिंपरी गावावर शोककळा पसरली आहे. यंवर्षी नाशिक जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई असून पाण्यासाठी नागरिकांना जीव गमवावा लागण्याची वेळ येत आहे.

ग्रामपंचायतिच्या खाणीत पडून पती,पत्नी सह पुतण्याचा मृत्यू..

नाशिकच्या सैय्यद पिंप्री या गावतील ग्रामपंचायतीच्या खाणीत पडून पती,पत्नी सह पुतण्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे..ह्या घटने मुळे परिसरात हळहळ होतेय .

नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात पाणी टंचाई असून नागरिकानं पाण्यासाठी वणवण करावे लागत आहे.पाणी टंचाई मुळे सैय्यद पिंप्री अनेक महिला ह्या ठिकाणी कपडे भांडी धुण्यासाठी येत असतात अशात सविता वारडे ह्या देखील पती आणि पुतण्या सोबत भांडे धुण्यासाठी खाणीत आल्या असता त्यांना पाण्याचा अंदाजनं आल्याने त्या 15 फूट पाण्यात पडल्या त्यांना वाचवण्यासाठी पती नंदू वराडे यांनी देखील पाण्यात उडी मारली मात्र ते देखील डुबत असल्याचे बघून पुतण्या केशव वराडे यांनी सुद्धा पाण्यात उडी मारली मात्र पाण्याचा अंदाजनं आल्याने तिघांचा ही पाण्यात बुडून मृत्यू झाला,गावकऱ्यांच्या मदतीने त्यांचे मृतदेह पाण्या बाहेर काढण्यात आले,
ह्या तिघांच्या मृतदेहावर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यातआल्यानंतर नंतर हे मृतदेह त्यांच्या नातेवाईकच्या स्वाधीन करण्यात आले.,ह्या घटनेनं सैय्यद पिंप्री या गावात शोककळा पसरली आहे,एकूणच यंदाच्या वर्षी नाशिक जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई असून पाण्यासाठी नागरिकांना जीव गमवावा लागण्याची वेळ येत आहे..
बाईट नातेवाईक..
 फीड ftp
Nsk-panyat budun mrutu viu 1
Nsk-panyat budun mrutu viu 1
Nsk-panyat budun byte..

Last Updated : Apr 5, 2019, 8:22 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.