ETV Bharat / state

अपघातास कारणीभूत ठरणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार - विश्वास नांगरे पाटील

काही दिवसांत नागरिकांनीही हेल्मेट आणि इतर नियमांबाबत अभ्यास करावा. त्यानंतर मात्र थेट कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिला.

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील
author img

By

Published : May 3, 2019, 11:13 PM IST

Updated : May 4, 2019, 4:34 AM IST

नाशिक - वाहतूक नियमांची जनजागृती आणि हेल्मेटसक्तीबाबत १३ मेपासून विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. त्याअंतर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन करून अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या वाहन चालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली.

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील

शहरात मागील वर्षभरात झालेले अपघात आणि सद्यस्थितीतील अपघातांचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले असले तरी दर दिवसाआड एका व्यक्तिचा मृत्यू अपघातात होतो. यावर्षी जानेवारीपासून एप्रिल महिन्यापर्यंत ५९ अपघातांमध्ये ६३ नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. या मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक अधिकार सुरक्षित करण्यासाठी नाशिक पोलिसांकडून काटेकोर उपाययोजना सुरू आहेत. काही दिवसात नागरिकांनीही हेल्मेट आणि इतर नियमांबाबत अभ्यास करावा. त्यानंतर मात्र थेट कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिला.

वाहतूक पोलीस विभाग आणि सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी संयुक्तपणे एकाच वेळी कारवाई करणार आहेत. विनापरवाना, मद्यप्राशन करून आणि उलट दिशेने वाहन चालवणे. तसेच ट्रिपल सीट, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवल्यास थेट कारवाई होणार असल्याचे नांगरे पाटील यांनी सांगितले.

Intro:नाशिक शहरात मागील वर्षभरात झालेले अपघात व सद्यस्थितीतील अपघातांचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले असले तरी दर दिवसाआड एका व्यक्तिचा मृत्यू अपघातात होतो या वर्षी जानेवारी पासून एप्रिल पर्यंत 59 अपघातांमध्ये 63 नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे हे प्रमाण चिंताजनक असून त्यामुळे रस्ते वाहतूक अधिकार सुरक्षित करण्यासाठी नाशिक पोलिसांकडून काटेकोर उपाययोजना सुरू असून यापुढे वाहतूक नियमांचे उल्लंघन करून अपघात कारणीभुत ठरणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली

Body:तसेच वाहतूक नियमांची जनजागृती व हेल्मेट सक्ती बाबत 13 मे पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे या दिवसाच्या कालावधीत नागरिकांनीही हेल्मेट उपलब्ध व इतर नियम अभ्यासू घ्यावेत त्यानंतर मात्र थेट कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी दिला

Conclusion:वाहतूक पोलीस विभाग व सर्व पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी संयुक्तपणे एकाच वेळी कारवाई करणार आहेत विनापरवाना वाहन चालविणे मद्यप्राशन करून वाहन चालवणे व तसेच उलट दिशेने वाहन चालवणे ट्रिपल सीट,क्षमते पेक्षा अधिक प्रवासी यांच्यावर नियमांचे उल्लंघन केल्यास थेट कारवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले..
Last Updated : May 4, 2019, 4:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.