ETV Bharat / state

नाशकातील बी.डी. भालेकर मैदानावर यावर्षी बसणार 'एकच गणपती' - ganesh festival 2020 nashik news

नाशिक शहरातील बी.डी. भालेकर मैदानावर दरवर्षी होणारी गर्दी लक्षात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ह्यावर्षी सर्व मंडळांनी मिळून एकच गणपती एकाच बॅनरखाली बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत सर्व मंडळानी मिळून निर्णय घेतल्याची माहिती मंडळाचे पदाधिकारी गणेश बर्वे व पदमाकर गावंडे यांनी दिली.

नाशकातील बी.डी. भालेकर मैदानावर यावर्षी बसणार 'एकच गणपती'

author img

By

Published : Aug 13, 2020, 3:40 PM IST

नाशिक : जिल्ह्यातील गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या बी.डी. भालेकर मैदानावर यावर्षी कुठल्याही स्वरुपाचा देखावा, विद्युत रोषणाई, साऊंडचा गाजावाजा न करता अत्यंत साध्या स्वरुपात एकच गणपती एकाच बॅनरखाली बसविण्यात येणार आहे. याबाबत सर्व मंडळांनी मिळून निर्णय घेतल्याची माहिती मंडळाचे पदाधिकारी गणेश बर्वे व पद्माकर गावंडे यांनी दिली.

जगभरात कोरोनाने घातलेले थैमान तसेच नाशिक शहरात वाढत असलेला कोरोना प्रादुर्भाव बघता यावर्षी अत्यंत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. नाशिक शहरातील बी.डी. भालेकर मैदानावर दरवर्षी होणारी गर्दी लक्षात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ह्यावर्षी सर्व मंडळांनी मिळून एकच गणपती बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच गणेशोत्सव साध्या पद्धतीने होणार असलातरी या दरम्यान रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, कोरोना टेस्ट, सर्वरोग निदान शिबीर, गरजूंना अन्नधान्य वाटप, मास्क वाटप, औषधे वाटप, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप इत्यादि सामाजिक उपक्रम राबविण्यात असल्याचे मंडळ पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच कोरोना जनजागृती करून आजपर्यंत मंडळानी केलेल्या सामाजिक कार्याची माहिती विडियो रेकॉर्डिंग करून फेसबुक, व्हाटसअ‌ॅप, युट्युबमार्फत नागरिकांपर्यंत पोहचविणार आहेत. या निर्णयाचे सर्व स्तारातून स्वागत होत असून हा नाशिक पॅटर्न संपूर्ण राज्यभर राबवावा असे आवाहन करण्यात आले आहे.

याप्रसंगी राजे छत्रपतीचे सचिन रत्ने, महिंद्रा सोनाचे राजेंद्र खैरणार, एचएएलचे हेमंत तेलंगी, महेश पगारे, नरहरी राजाचे गौरव बिरारी, मूक बधीरचे सुशांत गालफाडे, यशवंतचे कमलेश परदेशी, एमआयसीओचे संजय पाटील, महिंद्राचे प्रसाद शुक्ल, प्रसाद पंडित आदी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.