ETV Bharat / state

मालेगावात सोनाराला लुटणारी टोळी अटकेत - Nashik Crime news

मालेगाव शहरातील संगमेश्वर परिसरात 18 नोव्हेंबरच्या रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली होती. सोनार झुंबरलाल ज्वेलर्सचे मालक झुंबरलाल बागुल हे नेहमीप्रमाणे सोने-चांदीचे दागिने घेऊन घराकडे परतत असताना अॅक्टीव्हा गाडीवरुन आलेल्या आरोपींनी त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून 32 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पळ काढला होता.

मालेगावात सोनाराला लुटणारी टोळी अटकेत
author img

By

Published : Nov 20, 2019, 7:52 AM IST

नाशिक - मालेगाव शहरात सोने कारागीराच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून सुमारे 32 लाखांच्या दागिण्यांची लूटमार केल्याच्या प्रकरणाचा छावणी पोलीस ठाण्याच्या पथकाने तपास लावला आहे. यामध्ये 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून लुटमारीतील सुमारे 21 लाखांचे दागिने देखील हस्तगत करण्यात आले आहेत, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोनाराला लुटणारी टोळी अटकेत

मालेगाव शहरातील संगमेश्वर परिसरात 18 नोव्हेंबरच्या रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली होती. सोनार झुंबरलाल ज्वेलर्सचे मालक झुंबरलाल बागुल हे नेहमीप्रमाणे सोने-चांदीचे दागिने घेऊन घराकडे परतत असताना अॅक्टीव्हा गाडीवरुन आलेल्या आरोपींनी त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून 32 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पळ काढला होता. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

हेही वाचा - नाशिक जिल्हा परिषद अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रविण वाडिले यांनी गुन्हे शोध पथकाकडे या गुन्ह्याचा तपास सोपविला होता. अखेर गुप्त माहितीवरुन भाग्येश भगवान महाले (19, रा.चंदनपुरी गेट, हनुमान मंदिरासमोर) याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली देत गणेश राजेंद्र वडगे (18, रा. सावता चौक, वडगे गल्ली, संगमेश्वर) व उबेद उर्फ बद्दे शमसोद्दीन अन्सारी (21, रा. काकुबाईचा बाग, संगमेश्वर) यांचा सहभाग स्पष्ट झाला. यातील उबेद हा सराईत गुन्हेगार असून, महाले पोलिसांच्या हाती लागल्याची कुणकूण लागताच दोघे फरार झाले आहेत. त्यांची शोधमोहीम राबवण्यात येऊन दोघांनाही जेरबंद करण्यात आले. त्यांच्या उलट तपासणीतून आसिफ इकबाल सईद अहमद उर्फ आसिफ टेलर (रमजानपरा), जिशान अहमद नफिस अहमद (कुसुंबा रोड), असे 5 अरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

तर ताहिर जमाल शाहिद जमाल उर्फ ताहिर डॉन (रा. गोल्डननगर), आमिर शहा अरमान शहा उर्फ इम्मू (सलीमनगर), मुशिर व इम्मूचा मेहुणा भाईजान (सुरत) याचाही गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला आहे. हे 4 आरोपी अद्याप फरार आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा - नाशिक पालिकेच्या अखेरच्या महासभेवर तहकुबीची नामुष्की; केवळ सातच नगरसेवक हजर

लुटमारीचे सोने अरोपीनी नाशिकमधील मनिष रवींद्र सोनार (३३, रा. सरस्वती नगर, पंचवटी) याला विकल्याची कबुली आरोपींनी दिली. त्यानुसार पथकाने सोनारला ताब्यात घेत 21 लाख 60 हजार 774 रुपयांचे दागिने हस्तगत केले.

Intro:मालेगाव शहरात सोने कारागीराच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून सुमारे ३२ लाखांच्या दागिण्यांची लूटमार प्रकरणाचा तपास लावण्यात छावणी पोलिस ठाण्याच्या पथकाला यश आले आहे. यामध्ये पाच अट्टल आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून लुटमारीतील सुमारे 21 लाखांचे दागिने देखील हस्तगत करण्यात आले आहे अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.Body:मालेगाव शहरातील संगमेश्वर परिसरात 18 नोव्हेंबर च्या रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली होती. सोनार झुंबरलाल ज्वेलर्सचे मालक झुंबरलाल बागुल हे नेहमीप्रमाणे सोने-चांदीचे दागिने घेऊन घराकडे परतत असताना अँक्टीव्हा गाडीवरुन आलेल्या आरोपींनी त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून 32 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पळ काढला होता याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रविण वाडिले यांनी गुन्हे शोध पथकाकडे या गुन्ह्याचा तपास सोपविला होता. अखेर गुप्त माहितीवरुन भाग्येश भगवान महाले (19, रा.चंदनपुरी गेट, हनुमान मंदिरासमोर) याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली देत गणेश राजेंद्र वडगे (18, रा. सावता चौक, वडगे गल्ली , संगमेश्वर) व उबेद उर्फ बद्दे शमसोद्दीन अन्सारी (21, रा. काकुबाईचा बाग, संगमेश्वर) यांचा सहभाग स्पष्ट झाला. यातील उबेद हा सराईत गुन्हेगार असून, महाले पोलिसांच्या हाती लागल्याची कुणकूण लागताच दोघे फरार झाले.त्यांची शोधमोहीम राबवण्यात येऊन दोघांनाही जेरबंद
करण्यात आले. त्यांच्या उलट तपासणीतून आसिफ इकबाल
सईद अहमद उर्फ आसिफ टेलर (रमजानपरा), जिशान अहमद नफिस अहमद (कुसुंबा रोड), असे पाच अरोपी पोलिसांना पकडण्यात यश आले आहे तर ताहिर जमाल शाहिद जमाल उर्फ ताहिर डॉन (रा. गोल्डननगर), आमिर शहा अरमान शहा उर्फ इम्मू (सलीमनगर), मुशिर व इम्मूचा मेहुणा भाईजान (सुरत) याचाही गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न
झाला असुन हे चार आरोपी अद्याप फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेConclusion:लुटमारीचे सोने अरोपीनी नाशिकमधील मनिष रवींद्र सोनार (३३, रा. सरस्वती नगर, पंचवटी) याला विकल्याची कबुली आरोपींनी दिली. त्यानुसार पथकाने सोनारला ताब्यात घेत 21लाख 60 हजार 774 रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले. पाच आरोपींना अटक झाली असून, चार आरोपी अद्याप फरार आहेत...
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.