ETV Bharat / state

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्राचे काम लवकरच होईल पूर्ण - उदय सामंत - Savitribai Phule Pune University Nashik Sub Center

नाशिक हा उदयोग क्षेत्राच्या दृष्टीने संपन्न असा जिल्हा आहे. या ठिकाणी विविध उद्योगांना चालना देणारे व्यवसाय सुरू करता येतील. म्हणून या दृष्टीने भविष्याचा विचार करता उपकेंद्रात खाद्यपदार्थं, वाईन, पैठणी, दागीने निर्मितीशी संबंधित नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करण्याच्या सूचना उदय सामंत यांनी केल्या.

मंत्री उदय सामंत
मंत्री उदय सामंत
author img

By

Published : Sep 20, 2020, 8:52 PM IST

नाशिक- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्राचे काम लवकरच सुरू करून डिसेंबर महिन्यापर्यंत ते पूर्ण करण्यात येणार आहे. येत्या जानेवारी पासून हे उपकेंद्र विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात येणार असून, या केंद्रात उद्योग आधारित नाविन्यपूर्ण आभ्याक्रमांवर विशेष भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

माहिती देताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथील 'यश ईन' सभागृहात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्रांची आढावा बैठक पार पडली. त्यावेळी मंत्री उदय सामंत बोलत होते. सामंत पुढे म्हणाले की, नाशिक हा उद्योग क्षेत्राच्या दृष्टीने संपन्न असा जिल्हा आहे. या ठिकाणी विविध उद्योगांना चालना देणारे व्यवसाय सुरू करता येतील. म्हणून या दृष्टीने भविष्याचा विचार करता उपकेंद्रात खाद्यपदार्थ, वाईन, पैठणी, दागिने निर्मितीशी संबंधित नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.

तसेच, सदर अभ्यासक्रमे सुरू करण्यासाठी शासनामार्फत सहकार्य करण्यात येणार असल्याची माहितीही सामंत यांनी दिली. विद्यापीठ उपकेंद्र सुरू करण्यासाठी उपलब्ध केलेल्या जागेवर विद्यापीठाला शोभेल अशी सर्व सुविधायुक्त सूसज्ज इमारत बांधण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी विद्यापीठ उपकेंद्रासाठी दिलेल्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यात येणार असल्याची ग्वाही संबधित अधिकाऱ्यांना दिली.

हेही वाचा- येवल्यात पावसाचे थैमान; पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.