ETV Bharat / state

नवीन वर्षाच्या स्वागताला दाट धुक्याची चादर; नागरिकांना काश्मीरचा अनुभव - rural area of nashik

मनमाड शहर आणि नाशिकच्या ग्रामीण भागात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दाट धुक्याची चादर पसरली आहे. यामुळे वाहतूक मंदावली असून मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या काही रेल्वे गाड्याही उशिराने धावत आहेत.

nashik
मनमाडसह नाशिक ग्रामीण भागात दाट धुक्याची चादर
author img

By

Published : Jan 1, 2020, 1:37 PM IST

नाशिक - नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मनमाडसह नाशिकचा ग्रामीण भाग दाट धुक्यात हरवला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सूर्यदर्शन देखील झाले नसून दाट धुक्यामुळे चालकांना वाहन चालविणे कठीण झाले आहे. उत्तर भारतात देखील दाट धुके पसरल्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या काही रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली असून शहरातील नागरिक शेकोटी करून दाट धुक्याचा आनंद लुटत आहेत.

मनमाडसह नाशिक ग्रामीण भागात दाट धुक्याची चादर

मनमाड शहरात आज(बुधवार) सकाळी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सूर्यनारायण आलेच नाहीत. धुक्यामुळे मनमाड तसेच नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भाग आज दाट धुक्यात न्हाहून निघाला. तर, सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या काही जेष्ठ नागरिकांसह तरुण वर्गानेदेखील धुक्याचा आनंद लुटला.

शहरातून जाणारा इंदूर-पुणे महामार्ग पूर्णपणे धुक्यात बुडाला असल्याने वाहन चालकांना हेडलाईट सुरू करून हळूहळू गाड्या चालवाव्या लागत होत्या. तरीही, दाट धुक्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. तर, रेल्वेचे सिग्नल दिसत नसल्याने वाहतुकीवर देखील याचा परिणाम झाला. परिणानी रेल्वे सेवा काही काळाकरिता विस्कळीत झाली. तर, लांब पल्ल्याच्या गाड्या धिम्या गतीने सुरू असून यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

हेही वाचा - दिंडोरीत दाट धुक्याचा वाहतुकीवर परिणाम

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मनमाड, मालेगाव, येवला, चांदवड, नांदगाव, सटाणा शहर परिसर दाट धुक्यात हरविले. सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरल्यामुळे चालकांना वाहन चालविणे कठीण झाले. तर, उत्तर भारतात देखील दाट धुक्याची लाट आल्यामुळे त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला. त्यामुळे उत्तर भारतातून मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या काही ट्रेन्स उशिराने धावत आहेत. दाट धुक्यांमुळे कांदा, द्राक्षे यासह इतर पिके धोक्यात आली असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत देखील वाढ झाली असून धुके व थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

हेही वाचा - व्हायच होते शिक्षक, पण बनले पोलीस उपनिरीक्षक

Intro:मनमाड-नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मनमाडसह नाशिकचा ग्रामीण भाग दाट धुक्यात हरवला असुन सकाळी नवं वर्षाचे सूर्य दर्शन देखील झाले नाही
दाट धुक्यामुळे चालकांना वाहन चालविणे कठीण झाले असून उत्तर भारतात देखील दाट धुके पसरल्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या काही गाड्या उशिराने धावत आहे यामुळे मात्र प्रवाशांची गैरसोय झाली असून शहरातील नागरिक शेकोटी करून दाट धुक्याचा आनंद लुटत आहेBody:मनमाड शहरात आज सकाळी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सूर्यनारायण आलेच नाही मनमाड शहर तसेच नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भाग आज दाट धुक्यात न्हाहून निघाला आहे आज सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या जेष्ठ नागरिक यांच्यासह तरुण वर्गाने देखील धुक्याचा आंनद लुटला शहरातून जाणारा इंदूर पुणे महामार्ग पूर्णपणे धुक्यात बुडाला असल्याने वाहन चालकांना हेडलाईट सुरू करून देखील पुढील काही दिसत नसल्याने हळूहळू गाड्या चालवाव्या लागत होत्या यामुळे वाहतूक कोंडी झाली होती तर रेल्वेचे सिग्नल दिसत नसल्याने रेल्वेच्या वाहतुकीवर देखील याचा परिणाम झाला यामुळे रेल्वे सेवा काही काळाकरिता विस्कळीत झाली आहे.लांब पल्ल्याच्या गाड्या धीम्या गतीने सुरू असून यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.Conclusion:नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मनमाड,मालेगाव,
येवला,चांदवड,नांदगाव,सटाणा शहर परिसर दाट धुक्यात हरविले.सकाळी इतकं दाट धुकं होते की नवं वर्षाच्या पहिल्या दिवशी लोकांना सूर्य दर्शन देखील झाले नाही.सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरल्यामुळे समोरचं काही दिसत नव्हतं त्यामुळे चालकांना वाहन चालविणे कठीण झाले तर उत्तर भारतात देखील दाट धुक्याची लाट आल्यामुळे त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला असून उत्तर भारतातून मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या काही ट्रेन्स उशिराने धावत आहे.दाट धुक्यामुळे कांदा, द्राक्षे यासह इतर पिके धोक्यात आली आहे त्यामुळे बळीराजा चिंतीत झाला थंडीत देखील वाढ झाली असून धुके व थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे

आमिन शेख,मनमाड
बाईट अनिल वाघ नागरिक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.