नाशिक - कोरोनाच्या पहिल्या लाटेत संसर्ग हा प्रामुख्याने घरातील जेष्ठ आणि मध्यमवयीन लोकांना अधिक प्रमाणात झाला होता. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बालकांना आणि युवकांना अधिक प्रमाणात संसर्ग होतं असल्याचे समोर आले आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 8 हजार 830 बालकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं असून, पालकांनी न घाबरता मुलांची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
नाशिक जिल्ह्यात मागील वर्षी डिसेंबर 2020 मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत 12 वर्षा खालील मुलांना ताप, खोकला अशा प्रकारचे सौम्य लक्षणे आढळली. मात्र, तरीही त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी सामान्य होती. त्यामुळे 6 हजार बालकांना कोरोना झाला असला, तरी त्यातील बहुतांश बालकांना भरती करावे लागले नव्हते. तर 15 वर्षांपासून पुढील वयोगटातील मुलांमध्ये बाधितांची संख्या 16 हजार 612 इतकी होती. यात मागील वर्षात 10 हजार हुन अधिक भर पडली असल्याचे दिसून आले आहे.
हेही वाचा-माझ्या नवऱ्याने देशसेवा केली, आता त्याला वाचवण्याची जबाबदारी देशाची -पत्नीचे भावनिक आवाहन
हेही वाचा- रायगड जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांना बसणार मिनी लॉकडाऊनचा फटका