नांदेड - लग्न सोहळ्यात जेवणातून विषबाधा झाल्याची घटना नांदेडात घडली आहे. सध्या हे रुग्ण खाजगी आणि कंधार शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. या घटनेत रुग्णांवर उपचार सूर असून प्रकृती स्थिर आहे. अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यामुळे लग्न सोहळ्यात सहभागी झालेल्या नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे.
लग्न सोहळ्यात जेवणातून विषबाधा झाल्याची घटना नांदेडात घडली आहे. सध्या हे रुग्ण खाजगी आणि कंधार शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. या घटनेत रुग्णांवर उपचार सूर असून प्रकृती स्थिर आहे. अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यामुळे लग्न सोहळ्यात सहभागी झालेल्या नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे.
२५० ते ३०० लोकांना विषबाधा -
कंधार तालुक्यातील दिग्रस गावात हा लग्न सोहळा 21 नोव्हेंबर रोजी पार पडला. या कार्यक्रमातून जेवण केलेल्या जवळबास झाल्याची प्राथमिक माहिती आहे. उलट्या आणि मळमळ होत असल्याची लक्षनं या रुग्णांना जाणवत आहे. कंधार येथील शासकीय रुग्णालयात विषबाधा झालेल्या रुग्णांना दाखल करण्यात आलं आहे. सध्या रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
रूग्णांची प्रकृती स्थिर -
कंधार तालुक्यातील दिग्रस तालुक्यात लग्न समारंभात सहभागी झालेल्या नातेवाईकांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समीर आली आहे. खाजगी आणि शासकीय रुग्णालयात जवळपास २५० ते ३०० लोकांना जुलाब, उलट्या आणि मळमळ होत असल्याचं लक्षात आलं. या रुग्णांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेत उपचार सुरू केले. कंधार येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या या रुग्णांची परिस्थिती स्थिर आहे, अशी माहिती रूग्णालय प्रशासनाकडून देण्यातआली आहे.