नाशिक : नाशिकच्या ठाकरे गटातून गेलेल्या दलालांना भुईसपाट करण्यासाठी शिवसेना पक्ष कटिबद्ध राहील. येणाऱ्या निवडणुकांमध्ये ( Corporators JoinedCM Eknath Shinde in Mumbai ) गेलेल्या गद्दारांना त्यांची जागा दाखवू ( Former Corporators From Thackeray Group Joined Shinde Group ) देऊ. तसेच, बारा नगरसेवकांमधला एकही निवडून येणार नाही, असा इशारा नाशिकच्या ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात गेलेल्या माजी नगरसेवकांना ( Thackeray Faction of Nashik ) दिला.
शेवसेनेच्या माजी नगरसेवकांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश : नाशिकच्या उद्धव ठाकरे गटातून काही माजी नगरसेवकांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर ठाकरे गटाने शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद घेत शिंदे गटात सामील झालेल्या माजी नगरसेवकांनी आगामी निवडणुकीत निवडून येऊन दाखवा, असे आव्हानच दिले आहे.
अजय बोरस्ते यांनी पत्रकार परिषदेत काढला विषय : आज झालेल्या प्रवेशानंतर अजय बोरस्ते यांनी प्रतिक्रियेत सिल्वर ओकचा विषय काढला. त्यानंतर जे काही बोलले ते अत्यंत चुकीचे आहे. ज्या माणसाचा प्रवास हा गेल्या 12 वर्षांचा या पक्षामध्ये आहे. 2010 मध्ये बोरस्ते याने पक्षामध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना पाच-सहा वर्ष महानगरप्रमुख, गटनेते, स्थायी समिती सदस्य चार वर्ष, विरोधी पक्ष नेता, मग विधानसभेची उमेदवारी या सर्व गोष्टी शिवसेना पक्षाकडून देण्यात आल्या असताना यांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणे अत्यंत चुकीचे असल्याची भूमिका शिवसेना पदाधिकारी विजय करंजकर यांनी मांडली.
25 लाख घेतल्याची चर्चा : उद्धव ठाकरे गटातून शिंदे गटात सामील झालेल्या 12 माजी नगरसेवकांनी 25 लाख रुपये घेतल्याची चर्चा आहे. या आधीदेखील ठाकरे गटातून शिंदे गटात सामील झालेले नाशिक जिल्ह्यातील आमदार सुहास कांदे, खासदार हेमंत गोडसे, दादा भुसे यांनी 50 खोके घेतल्याची चर्चा नाशिकमध्ये होती. माझी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यासह चंद्रकांत खोडे, सूर्यकांत लवटे, पुनम मोगरे, आर. डी. धोंगडे, ज्योती खोले, सुदाम ढेमसे, जयश्री खर्जुल, सुवर्णा मटाले, डी. जी. सूर्यवंशी, श्याम कुमार साबळे यांच्यासह मनसेचे शहर समन्वयक सचिन भोसले आणि भाजप शहर पदाधिकारी प्रताप मेहरोलिया यांनी प्रवेश केला.
इतरही नगरसेवक येतील : संजय राऊत यांच्या दौऱ्यानंतर 12 नगरसेवक आज बाळासाहेबांची शिवसेना अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये आले आहेत. या सर्वांच्या माध्यमातून नाशिकचा विकास साधला जाईल, लवकरच उद्धव सेनेमधील अन्य नाराज नगरसेवक बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात येतील असे खासदार हेमंत गोडसे यांनी म्हटले