ETV Bharat / state

नाशिकमध्ये गुलाबी थंडीला सुरुवात; पारा 12.6 अंशावर

author img

By

Published : Dec 13, 2019, 4:55 PM IST

Updated : Dec 13, 2019, 7:56 PM IST

गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये थंडी पडायला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी तापमान अचानक 12.6 अंशापर्यंत घसरले. त्यामुळे वातावरणात अचानक गारवा जाणवत होता.

नाशिकमध्ये गुलाबी थंडीला सुरुवात

नाशिक - गेल्या काही दिवसांपासून शहरात थंडी पडायला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी पारा अचानक 12.6 अंशापर्यंत घसरले. त्यामुळे वातावरणात अचानक गारवा जाणवत होता.

नाशिकमध्ये गुलाबी थंडीला सुरुवात

हेही वाचा - धक्कादायक..! तामिळनाडूमध्ये विष घेऊन एकाच कुटुंबातील 5 जणांची आत्महत्या

गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात किमान 16 ते 17 अंश सेल्सिअस, तर कमाल 29 ते 30 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. मात्र, या थंडीमुळे सकाळी आणि रात्री वातावरणात गारवा जाणवात होता. मात्र, दुपारच्या सुमारास काही प्रमाणात नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. त्यामुळे सकाळी थंडी, दुपारी उन, असे काहीसे वातावरण सध्या पाहायला मिळत आहे. हिवाळा ऋतू सुरू झाला असला, तरी जिल्ह्यात यावर्षी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी थंडी पडायला सुरुवात झाली. त्यामुळे उशिरापर्यंत ही थंडी राहील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

राज्यात महाबळेश्वर सोबतच नाशिकमध्ये सर्वाधिक कमी तापमानाची नोंद होत असते. या काळात नाशिककर गुलाबी थंडीचा आनंद घेत असतात. आता थंडीला सुरुवात झाल्यामुळे सकाळच्या सुमारास फिरायला जाणाऱ्यांची गर्दी देखील वाढली आहे. तसेच थंडीच्या दिवसात पर्यटक नाशिकला पसंती देत असतात. त्यामुळे हिवाळ्यात येथे येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण देखील वाढत आहे. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये पारा 5 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला होता, तर यावर्षी उशिराने सुरू झालेली ही थंडी अधिक काळापर्यंत राहील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Intro:नाशिकचं तापमान 12 अंशावर...गुलाबी थंडीला सुरवात...

Body:नाशिकचं तापमान आज अचानक 12.6 अंशावर खाली आलं..त्यामुळे वातावरणात अचानक गारठा जाणवला...गेल्या पंधरा दिवसां पासून नाशिक मध्ये किमान 16 ते 17 अंश सेल्सिअस तर कमाल 29 ते 30 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होतं आहे, सकाळी आणि रात्री वातावरणात गारठा जरी जाणवत असला तरी दुपारच्या सुमार काही प्रमाणात नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे...

यंदा उशिराने नाशिक मध्ये थंडीला सुरवात झाली..त्यामुळे आता उशिरा पर्यंत थंडी राहील असा अंदाज वर्तवला जात आहे...
राज्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद महाबळेश्वर सोबतच नाशिकमध्ये होतं असते..ह्या काळात नाशिककर गुलाबी थंडीचा आनंद घेत असतात.सकाळच्या सुमारास मॉर्निग वॉक साठी देखील नागरिकांची गर्दी वाढली आहे.तसेच थंडीच्या दिवसात पर्यटक देखील नाशिकला पसंती देत असतात..मागील वर्षी ह्या महिन्यात सर्वाधिक 5 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान खाली आलं होतं,यंदा उशिराने सुरू झालेली थंडी अधिक काळ राहील असा अंदाज वर्तवला जात आहे...

Conclusion:
Last Updated : Dec 13, 2019, 7:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.