ETV Bharat / state

Water Issue Nashik : महादरवाजामेट परिसरात पेयजलाचे विविध स्त्रोत उपलब्ध - प्रांताधिकारी तेजस चव्हाण

मेटघर किल्ला ग्रामपंचायतीने ठक्कर बाप्पा योजनेतून डोंगर पायथ्याशी नवीन विहीर खोदण्यात आली असून या विहिरीला 25 ते 30 फुट पाणी आहे. त्या विहिरीतून पाड्यापर्यंत पाईपलाईनचे काम देखील पूर्णत्वास येत आहे. पाडा परिसरात पेयजलाचे विविध स्त्रोत उपलब्ध आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी दिली आहे.

पाहणी करताना अधिकारी
पाहणी करताना अधिकारी
author img

By

Published : Apr 7, 2022, 5:14 PM IST

नाशिक - नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील महादरवाजमेट पाडा परिसरात पेयजलाचे विविध स्त्रोत उपलब्ध आहेत. मेटघर किल्ला ग्रामपंचायतीने ठक्कर बाप्पा योजनेतून डोंगर पायथ्याशी नवीन विहीर खोदण्यात आली असून या विहिरीला 25 ते 30 फुट पाणी आहे. त्या विहिरीतून पाड्यापर्यंत पाईपलाईनचे काम देखील पूर्णत्वास येत आहे. समक्ष ग्रामस्थांशी चर्चा करून त्र्यंबकेश्वर गटविकास अधिकारी पंचायत समिती व अभियंता पाणी पुरवठा यांना या विहिरीत मोटार बसविणे व पाड्यापर्यंत पाण्याचा पुरवठा आजच तत्काळ सुरळीत करणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्र्यंबकेश्वर प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली आहे.

जिल्ह्यातील मेटघर किल्ला ग्रामपंचायत अंतर्गत महादरवाजामेट या पाड्याची लोकसंख्या अंदाजे ३६९ इतकी असून या पाड्यावरील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबाबत प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. महादरवाजामेट या पाड्याला लागून ग्रामपंचायतच्या मालकीच्या तीन विहिरी आहेत. त्यापैकी एक विहीर पाड्याच्या उत्तरेस पाचशे मीटर अंतरावर ज्यातून नियमित पाण्याचा वापर होतो. या विहिरीचे पाणी संपल्यानंतर पाड्याच्या पूर्वेस चारशे मीटर अंतरावर असणाऱ्या दुसऱ्या विहिरीतून पाण्याचा वापर होतो. मात्र मागील पंधरा दिवसापासून त्या विहिरीत पाणी कमी झाल्याने त्या ठिकाणी एक महिला विहिरीत उतरून पाणी भरत असल्याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आहे. या दुसऱ्या विहिरीच्या 100 मीटर अंतरावर पूर्वेस असणारी तिसऱ्या विहिरीत आठ ते दहा फूट पाणी असून हे पाणी पिण्यायोग्य नाही, अशी ग्रामस्थांची धारणा आहे. पाणी पिण्यायोग्य नसल्याची ग्रामस्थांची धारणा असल्याने प्रयोगशाळेत पाण्याची तपासणी करून व गरजेनुसार त्यावर आवश्यक ती प्रक्रिया करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी तसेच उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा यांना करण्यात आली आहे.

हेही वाचा - Kirit Somaiya : किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी औरंगाबादमध्ये शिवसैनिकांचे ठिय्या आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.