ETV Bharat / state

नाशिकमध्ये गाड्या जाळपोळीचे सत्र सुरुच; पंचवटी भागात बंगल्याच्या बाहेर उभी चारचाकी जाळली - टाटा हेक्झा

दोन ते तीन दिवसांपूर्वीच म्हसरुळ परिसरातील बोरगड वाढणे कॉलनी भागात असलेल्या भास्कर सोसायटीत देखील तीन दुचाकी गाड्या जाळल्याची घटना उघडकीस आली होती. आता भरवस्तीत घडलेल्या या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

नाशिकमध्ये जाळपोळीचे सत्र सुरूच; अज्ञात समाजकंटकांनी जाळली चारचाकी गाडी
author img

By

Published : Jul 22, 2019, 1:05 PM IST

नाशिक - नाशिक मध्ये जाळपोळीचे सत्र अजूनही सुरुच आहे. पंचवटी येथील भगवती नगर भागातल्या गुरुकृपा बंगल्याच्या बाहेर उभी असलेली टाटा हेक्झा ही चारचाकी गाडी रात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी जाळल्याची घटना समोर आली आहे.

नाशिकमध्ये जाळपोळीचे सत्र सुरूच; अज्ञात समाजकंटकांनी जाळली चारचाकी गाडी

याबाबत पोलीसांनी दिलेली माहितीनुसार, नाशिक बाजार समितीत भाजीपाल्याचा व्यापार करणारे दिलीप अंबरपुरे (रा.गुरुकृपा बंगला,भगवती नगर) हे काल रात्री नित्यनियमाने आपले कामकाज उरकून घरी आले. त्यांनी आपली टाटा हेक्झा (एमएच 15 जीएफ 8089) ही बंगल्याच्या बाहेर पार्क केली. त्यानंतर रात्री दीड ते दोनच्या सुमारास, जोराचा आवाज झाल्याने अंबरपुरे कुटुंब तसेच जवळपासचे नागरिक जागे झाले. काहीतरी जळाल्याचे समजतात अंबरपुरे यांनी बंगल्याबाहेर धाव घेतली. आपल्या गाडीवर कोणीतरी पेट्रोल टाकून जाळल्याचे लक्षात येताच त्यांनी सदर बाब तात्काळ पोलिसांना आणि अग्निशमन दलाला कळविली. पंचवटी अग्निशमन दलाच्या अमृतधाम उपकेंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविली.

भरवस्तीत घडलेल्या या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे दोन ते तीन दिवसांपूर्वीच म्हसरूळ परिसरातील बोरगड वाढणे कॉलनी भागात असलेल्या भास्कर सोसायटीत देखील तीन दुचाकी गाड्या जाळल्याची घटना उघडकीस आली होती.

Intro:नाशिक मध्ये जाळपोळीच संत्र सुरूच असुन पंचवटी येथील हिरावाडी भगवती नगर येथील गुरुकृपा बंगल्याच्या बाहेर लावलेली टाटा हेक्सा चार चाकी गाडी पहाटेच्या सुमारस अज्ञात समाजकंटकांनी जाळल्याची घटना घडली आहे.Body:याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की,नाशिक बाजार समितीत दिलीप अंबरपुरे (रा.गुरुकृपा बंगला,भगवती नगर) भाजीपाला व्यापार करतात.हे काल रात्री नित्यनियमाने आपले कामकाज उरकून घरी आले व टाटा हेक्सा एमएच 15 जीएफ 8089 ही बंगल्याच्या बाहेर पार्क केली. आज पहाटे दीड ते दोन वाजेच्या सुमारास अज्ञातांनी टाटा हेक्सा वाहन पेट्रोल टाकून जाळून पसार झाले.जोराचा आवाज झाल्याने जवळपासचे नागरिक जागे झाले, काहीतरी जळाल्याचे समजतात अंबरपुरे यांनी बंगल्याबाहेर धाव घेतली असता गाडी जळताना दिसली. सदर बाब तात्काळ पोलिसांना कळविली व घटनास्थळी पंचवटी अग्निशमन दलाच्या अमृतधाम उपकेंद्र जवानांनी धाव घेत चारचाकी विझविली.Conclusion:भरवस्तीत घडलेल्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे दोन ते तीन दिवसांपूर्वी म्हसरूळ परिसरातील बोरगड वाढणे कॉलनी भागात असलेल्या भास्कर सोसायटीत तीन दुचाकी जाळल्याची घटना उघडकीस आली होती.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.