ETV Bharat / state

Tall Buildings Not allowed In Nashik : नालासाठी घोडा रखडणार? नाशिकमध्ये उंच इमारतींना मनाई, वाचा काय आहे कारण... - Tall Buildings Not allowed In Nashik

Tall Buildings Not allowed In Nashik : शहरात अधिक उंचीच्या इमारतींना परवानगी देण्याची तरतूद आहे. मात्र या इमारतींमध्ये काही दुर्घटना घडल्यास आपत्ती निवारणासाठी आवश्यक 90 मीटर उंचीच्या अग्निशमन शिडी खरेदी प्रक्रियेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यात. त्यामुळे नाशिक शहरात 70 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींना बांधकाम परवानगी न देण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे.

Tallest Building Banned In Nashik
नाशिकमध्ये उंच इमारतींना मनाई
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 4, 2023, 12:14 PM IST

नाशिक Tall Buildings Not allowed In Nashik : आग विझवण्यासाठीची शिडी पुरवठादार कंपनी दिवाळखोरीत निघाल्यामुळे 90 मीटर उंचीपर्यंतची आग ( Tallest Building ) विझवण्यासाठी उपयुक्त शिडी खरेदी खरेदी करता येत नाही. तसं पत्र महानगरपालिकेच्या अग्निशमक विभागाने दिलंय. नगररचना विभागाने थेट नवीन शिडी खरेदी करेपर्यंत 70 मीटर उंची पुढील इमारतींना बांधकाम परवानगीच न देण्याचा फतवा काढला आहे. यामुळे बांधकाम व्यवसायिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

120 मीटर उंचीच्या इमारतींना परवानगी नाही : (Nashik News) नाशिक महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने 90 मीटर उंचीपर्यंतची आग विझवण्यासाठी उपयुक्त शिडी नसल्याने, शिडी खरेदी करेपर्यंत 70 मीटर पुढील इमारतींना बांधकामाला परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यापूर्वी 30 मीटर उंचीची अग्नी प्रतिबंधित शिडी असताना 120 मीटर उंचीच्या इमारतींना बांधकाम परवानगी दिली होती. आता अचानक नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या अजब पवित्र्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत आयुक्त अशोक करंजकर यांना अंधारात ठेवून निर्णय घेतल्यामुळे प्रकरणाचं गांभीर्य वाढलं आहे.

शिडी नाही म्हणून परवानगी नाही : मुंबई, पुण्यानंतर नाशिकच्या रियल इस्टेट क्षेत्राला पसंती वाढली आहे. नाशिकचं वातावरण चांगलं असल्यानं, घर खरेदीचा कल वाढत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील बांधकाम व्यवसायकांनी मोठ-मोठे प्रकल्प साकारण्यात सुरुवात केली आहे. सद्यस्थितीत गोविंद नगर भागात 120 मीटर उंचीची इमारत साकारली जात आहे. हाय राईज इमारतींना चांगली पसंती मिळत आहे. अशा बिल्डिंगमध्ये अग्निशमन व्यवस्था कार्यान्वित करण्याचे नियम कठोर आहेत. तसंच या नियमांचं पालन केल्याची खात्री झाल्याशिवाय नगररचना विभाग बांधकाम पूर्णत्वाचा दाखलाही देत नाही. असं असताना नगररचना विभागाने अग्निशामक विभागाच्या एका पत्राच्या अनुषंगाने घेतलेल्या निर्णयामुळे बांधकाम व्यवसायिकांमधून संताप व्यक्त होत आहे. आता 70 मीटर उंची पुढील इमारतींना बांधकाम परवानगी देऊ नये असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता नव्याने होणाऱ्या हायराईज इमारतींचं काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नव्याने निविदा काढणार : अग्निशमन विभागाकडून 90 मीटरची हायड्रोलिक प्लॅटफॉर्म खरेदी करण्यासाठी प्रक्रिया झाल्यानंतर फिनलॅंड येथील वेसा लिफ्ट आये या कंपनीला नोव्हेंबर 2018 मध्ये आदेश दिले गेले. 31 मे 2023 पर्यंत कंपनीकडून पुरवठा केला जाणार होता. मात्र कंपनी दिवाळीखोरीत निघाली. ही बाब लक्षात येताच अग्निशामक अधिकारी संजय बैरागी यांनी नवीन निविदा प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीचे अनुभव लक्षात घेता निविदा व प्रत्यक्ष पुरवठा यात दोन वर्षाचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे 8 ऑगस्ट 2023 मध्ये पत्र पाठवून 70 मीटर उंची पुढील इमारतींना बांधकाम परवानगी देऊ नये अशी शिफारस त्यांनी केली. नगररचना विभागाने बांधकाम परवानगीच बंद करून टाकल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

फेरविचार केला जाईल : 90 मीटर उंचीपुढील शिडी खरेदी करेपर्यंत, (Purchase 90 Meter High Fire ladder ) 70 मीटर पुढील उंचीच्या इमारतींना बांधकाम परवानगी बंद करण्याचा निर्णयाचा फेरविचार केला जाईल, असं महानगरपालिका आयुक्त डॉ अशोक करंजकर यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा -

  1. Thane News: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात अग्निशमन दलाची क्षमता नसतानाही गगनचुंबी इमारतींना परवानगी
  2. जगातील सर्वात उंच ४२ मजली 'एसआरए' टॉवर्स मुंबईत; टॉवरमध्ये घरांचे वितरण सुरू
  3. Tall Building Window Net : विना ग्रिलच्या उंच इमारतींना जाळ्या लावणे धोकादायक; अग्निशमन दलाचे स्पष्टीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.