दिंडोरी (नाशिक) : द्राक्षाची पंढरी संबोधला जाणारा नाशिक जिल्हा आणि जिल्ह्यातील शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या निर्यात केलेल्या द्राक्षाचे पैसे निर्यातदारांनी लवकरात लवकर द्यावेत. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिला आहे.
हेही वाचा... आधी कोरोना अन् आता निसर्ग चक्रीवादळाने तोंडचा घास हिरावला, नाशकातील बागायतदारांची व्यथा
कोरोना लॉकडाऊनच्या काळातही नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त द्राक्ष निर्यात झाले होते. प्राप्त माहितीनुसार सर्वच द्राक्षे कंटेनरच्या माध्यमातून परदेशात व्यवस्थित पोहचल्याचे दिसून आले. त्यामुळे निर्यात कंपन्याना तोटा होण्याचा प्रश्नच उद्धभवत नाही. म्हणून ज्या निर्यातदारांना शेतकऱ्यांकडून द्राक्ष खरेदी केले, त्यांनी शेतकऱ्यांना कोरोनाच्या नावाखाली वेठीस धरण्याचे काम करु नये. शेतकऱ्यांना लवकरात लवकर पैसे द्यावेत. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन उभारेल, असे स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना सांगितले.