ETV Bharat / state

तहसीलदार हे आमदार सुहास कांदेंच्या दबावाखाली काम करतात-सुषमा अंधारे - ठाकरे गट महाप्रबोधन यात्रा

Sushma Andhare On Suhas Kande : ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा रविवारी (10 डिसेंबर) मनमाडमध्ये दाखल झाली. यानिमित्त मनमाड येथे सायंकाळी जाहीर सभेसाठी आलेल्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या काळे झेंडे दाखवून विरोध केला. त्यानंतर अंधारे यांनी एकात्मता चौकात झालेल्या जाहीर सभेत आमदार कांदे यांच्यावर जोरदार टीका केली.

sushma andhare criticized shinde group mla suhas kande in manmad
सुहास कांदे आणि सुषमा अंधारे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 11, 2023, 10:04 AM IST

तहसील अधिकाऱ्यांसह आमदार सुहास कांदे यांच्यावर हल्लाबोल

मनमाड Sushma Andhare On Suhas Kande : सुहास कांदे, तुम्ही काहीही करा 2024 मध्ये तुमच्यावर गुलाल पडणार नाही, हे मी आज छातीठोकपणे सांगते. ज्यांना माणसाचा विटाळ होतो, अशांना तुम्ही कसं निवडून दिलं? उभ्या महाराष्ट्रात तहसीलदार सभेची परवानगी नाकारू शकत नाही. मात्र, नांदगावच्या तहसीलदारांनी कशी परवानगी नाकारली?, मी सभागृहात प्रश्न विचारून याचा तपास करेल. तुम्ही सरकारचा पगार घेता की कांदेंचा, अशी टीका सुषमा अंधारे यांनी तहसीलदारावर केली.

आपला स्वाभिमान गहाण ठेवणार का? : यावेळी अंधारे यांनी आमदार कांदे यांच्यावर आजपर्यंत दाखल असलेल्या गुन्ह्याचे व्हिडीओ दाखवले. तसंच त्या म्हणाल्या की, निवडणूक आयोगानं माहिती लपवली म्हणून आमदार कांदेंवर कारवाई करावी. तसंच मी ज्या रस्त्यानं आले त्या रस्त्याला कांदे आणि त्यांचे 200 रुपये रोजाचे भाडोत्री लोकं गोमूत्र टाकून धुवणार असल्याचं समजलं. ज्यांना आमचा विटाळ होतो, अशा माणसाच्या मागं जाऊन तुम्ही आपला स्वाभिमान गहाण ठेवणार का? हे आता मनमाडच्या जनतेनं ठरवावं.

माझी गाडी अडविणाऱ्या आया-बहिणींनी किमान 200 रुपयांच्या जागी दोन हजार रुपये घेऊन आपली लायकी वाढवावी. सुहास कांदेंवर मोठ्या प्रमाणात गंभीर गुन्हे दाखल आहेत. आता मनमाडसह नांदगाव तालुक्यातील जनतेनं बोटाला शाई लावायची की थुंकी हे त्यांनीच ठरवाव-ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे

आता कुठं गेलं तुमचं हिंदुत्व? : पुढं त्या म्हणाल्या की, येथील तहसीलदार सिद्धार्थ मोरे हे आमदार कांदेंच्या दबावाखाली काम करतात, याचे अनेक उदाहरण आहेत. माझ्या सभेला परवानगी नाकारून तुम्ही स्वतःवर संकट ओढवुन घेतलंय. तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसचं वावडं होतं. हिंदुत्वाच्या गोष्टी करून तुम्ही पक्ष सोडून पळाले. त्याच अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसताय. आता कुठं गेलं तुमचं हिंदुत्व? तसंच सभा होऊ नये यासाठी पत्र कोणी दिलं? चपटी कितीला मिळते असं विचारलं, यामुळं सभेत एकच हशा पिकला. तसंच दोन नंबर धंदे करणाऱ्यांनी वैचारिक सभा होऊ नये, असं पत्र देणं योग्य आहे का ? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

हेही वाचा -

  1. मनमाडला शिंदे गटाकडून शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न
  2. ललित पाटील ड्रग्स प्रकरण; सुषमा अंधारेंना नाशिकहून पत्र, अनेक राजकीय नेत्यांची नावं पत्रात असल्याचा अंधारेंचा दावा
  3. Shambhuraj Desai Notice: मंत्री शंभूराज देसाईंकडून सुषमा अंधारे यांना कायदेशीर नोटीस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.