ETV Bharat / state

नाशिक जिल्ह्यातील ऑक्सिजन तुटवडा दूर; गरज पूर्ण होऊन 20 मेट्रिक टन उरतोय - sufficient oxygen storage in nashik

एक महिन्यापुर्वी देशात कोरोना अ‌ॅक्टिव्ह रुग्णात नाशिक प्रथम क्रमांकावर होते. पाॅझिटिव्ह रुग्णांचा आकडा ३५ हजाराच्या पुढे गेला होता. व्हेंटिलेटरवर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या तीन ते चार हजारांच्या घरात होती. त्यामुळे ऑक्सिजन बेडची मागणीत मोठी वाढ झाली होती. तर ऑक्सिजनचाही मोठा तुटवडा निर्माण झाला होता. दिवसाला जिल्ह्यास १३५ मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता होती.

sufficient oxygen storage in nashik
नाशिक जिल्ह्यातील ऑक्सिजन तुटवडा दूर
author img

By

Published : May 29, 2021, 9:12 AM IST

Updated : May 29, 2021, 9:57 AM IST

नाशिक - लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असल्याचे चित्र आहे. परिणामी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची रोजची मागणीदेखील मोठ्या प्रमाणात घटली आहे. एक महिन्यापुर्वी जिल्ह्याची ऑक्सिजन गरज दिवसाला १३५ मेट्रिक टन होती. रुग्णसंख्येत घट झाल्याने आता ही मागणी दिवसाला ७५ मेट्रिक टनने कमी झाली आहे. सद्यस्थितीत दिवसाला ६० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज असून दिवसाला जिल्ह्यासाठी ८० मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होत आहे.

अखेर ऑक्सिजनचा तुटवडा संपला -

एक महिन्यापुर्वी देशात कोरोना अ‌ॅक्टिव्ह रुग्णात नाशिक प्रथम क्रमांकावर होते. पाॅझिटिव्ह रुग्णांचा आकडा ३५ हजाराच्या पुढे गेला होता. व्हेंटिलेटरवर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या तीन ते चार हजारांच्या घरात होती. त्यामुळे ऑक्सिजन बेडची मागणीत मोठी वाढ झाली होती. तर ऑक्सिजनचाही मोठा तुटवडा निर्माण झाला होता. दिवसाला जिल्ह्यास १३५ मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता होती. मात्र, केंद्राकडून जिल्ह्यासाठी दिवसाला ८५ मेट्रिक टन ऑक्सिजन कोटा उपलब्ध केला जात होत‍ा. अतिरिक्त गरज भागविण्यासाठी नगर व औरंगाबाद जिल्ह्यातून ऑक्सिजन मागवण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली होती. तरीदेखील दिवसाला १०३ मेट्रिक टन ऑक्सिजनची उपलब्धता होत होती. इतके करुनही ३२ मेट्रिक टनची कमतरता होती. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांचे प्राणदेखील गेल्याच्या घटना घडल्या. ऑक्सिजन तुटवडा दूर करण्यासाठी विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन एक्सप्रेसने दोन टँकर मागविण्यात आले होते. मात्र, लाॅकडाऊनचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळत असून रुग्णसंख्या कमी झाली आहे.

हेही वाचा - मान्सूनपुर्व पावसाचे जोरदार आगमन, शेतकऱ्यांची धावपळ

पाॅझिटिव्हिटिचा दरही दहा टक्क्यांपर्यत खाली उतरला आहे. परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्येत घट होत असल्याने रुग्णालयात ऑक्सिजनच्या मागणीतही हळूहळू कमतरता येत आहे. दिवसाची गरज १३५ मेट्रिक टनहून ६० मेट्रिक टनवर आली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ८० मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. दिवसाची गरज बघता २० मेट्रिक टन अधिकचा ऑक्सिजन आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.

औद्योगिक क्षेत्रासाठीच्या ऑक्सिजनबाबत निर्णय लवकरच घेणार -

जिल्ह्याची दिवसाची १३५ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज ६० मेट्रिक टनवर आली आहे. सद्यस्थितीत सर्व गरज भागवून २० मेट्रिक टन ऑक्सिजन अधिकचा आहे. गरज कमी झाली असली तरी औद्योगिक क्षेत्रासाठी ऑक्सिजन पुरवठा पूर्ववत करायचा की नाही? याचा निर्णय प्रशासनाकडून मार्गदर्शक तत्वे प्राप्त झाल्यानंतर घेतला जाईल, असे अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यानी सांगितले.

हेही वाचा - नाशिक : पिंपळगाव टोलनाक्याजवळ पुष्ट्याने भरलेल्या ट्रकला भीषण आग

Last Updated : May 29, 2021, 9:57 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.