ETV Bharat / state

Suffering Of Tomato Farmer : सोने गहाण ठेवून पिकवलेल्या टोमॅटोला कवडीमोल भाव; शेतकऱ्याची व्यथा

Suffering Of Tomato Farmer : सोने गहाण ठेवून पिकवलेल्या टोमॅटोला कवडीमोल भाव (Tomato prices fallen) मिळत असल्याने येवल्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी (Tomato farmers) आर्थिक संकटात सापडला आहे. अशात सण कसे साजरे करावे, असा मोठा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे. (Tomatoes at bargain prices )

Suffering Of Tomato Farmer
येवल्यातील शेतकऱ्याची व्यथा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 4, 2023, 6:49 PM IST

टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याची प्रतिक्रिया

येवला (नाशिक) : Suffering Of Tomato Farmer : कधी अवकाळी पाऊस तर कधी दुष्काळ अशा अनेक संकटांवर मात करत येवला तालुक्यातील मुखेड फाटा जऊळके येथील सचिन दाते या शेतकऱ्याने आपल्या पत्नीचे सोने गहाण ठेवत टोमॅटो पिकवले. मात्र, अक्षरश: टोमॅटोला 40 ते 45 रुपये कॅरेट असा कवडीमोल भाव मिळू लागल्याने केलेला उत्पादन खर्च देखील निघणे कठीण झाले. अशात आपली जनावरं तरी पोट भरतील याकरिता त्यांनी उभ्या टोमॅटोच्या पिकात जनावरे चरण्यास सोडून दिली. आता गहाण ठेवलेले सोने कसे सोडवावे, असा मोठा प्रश्न या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला पडला आहे.

मंत्र्यांचे दुर्लक्ष, शेतकऱ्याचा आरोप: सचिन दाते या शेतकऱ्याने आपल्या तीस गुंठ्यामध्ये टोमॅटो पीक घेतलं होतं. भाव मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी व त्याच्या पत्नीनं पिकाला मुलासारखं पिक पिकवलं; मात्र बाजारात विक्री करण्याची वेळ आली त्यावेळेस अक्षरश: ४० रुपये कॅरेट भाव मिळू लागला. शेतकऱ्याला वाहतूकीसह तोडणीकरिता ६० रुपये येऊ लागले. हातात काही शिल्लक राहत नसल्याने अक्षरशः उभ्या टोमॅटोच्या पीकावर शेतकऱ्यांनी शेतात जनावरे सोडून दिली आहेत. तरी मुखेड फाटा नाशिक-संभाजीनगर महामार्गालगत असल्याने येथून अनेक खासदार, आमदार तसेच मंत्री ये जा करतात; मात्र या मंत्र्यांना आमचा लाल चिखल दिसत नसल्याचा आरोप या तरुण टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे. आता सरकारने लक्ष देऊन कांद्याप्रमाणे टोमॅटोला देखील अनुदान द्यावे अशी मागणी टोमॅटो उत्पादकांकडून होताना दिसत आहे.

विकतच्या पाण्यावर पिकं जगविण्याची वेळ: दोन महिन्यांपूर्वी याच टोमॅटोला उच्चांकी बाजारभाव मिळत होता. म्हणून या आशेवर टोमॅटो पीक घेतलं. पण बाजारभाव कोसळल्याने टोमॅटो पिकावर झालेला सर्व खर्च अंगलट येणार आहे अशी व्यथाही शैलेश गाडेकर या तरुण शेतकर्‍याने मांडली आहे. सध्या पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांसह वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत. अशा कठीण परिस्थितही पिंपळगाव देपा खंडेरायवाडी आदी गावांमधील शेतकर्‍यांनी खासगी टॅंकरव्दारे विकतचे पाणी आणून टोमॅटोचे फड जगवले आहेत. पण टोमॅटोला कवडीमोल बाजारभाव मिळू लागल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

पिकावरील खर्चही वसूल होणार नाही: पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही चांगले बाजारभाव मिळतील म्हणून टोमॅटोचे पीक घेतले. मात्र आज याच टोमॅटोला मार्केटमध्ये प्रतिकिलोस तीन ते चार रुपयांचा बाजारभाव मिळत आहे. यामुळे टोमॅटो पिकावर झालेला खर्चही वसूल होणार नसल्याचं शेतकरी शैलेश गाडेकर म्हणाले आहे.

हेही वाचा:

  1. Tomato Rate Decreased : टोमॅटो आता शेतकऱ्यांना रडवणार! प्रतिकिलोस केवळ तीन ते चार रुपयांचा भाव
  2. Nanded News : चर्चा तर होणारच! तीस गुंठे शेतात केली वांग्याची लागवड; चार लाखाचे काढले उत्पन्न
  3. Prices Fell : भाव कोसळले, साडेतीन एकर कोथिंबिरीवर फिरवला रोटाव्हेटर,खर्चही आला अंगलट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.