ETV Bharat / state

नाशिकच्या के. एस. के. डब्ल्यू महाविद्यालयाबाहेर विद्यार्थ्यांमध्ये तुफान राडा

सिडको परिसरातील उत्तम नगर येथील के. एस. के. डब्ल्यू कॉलेजच्या बाहेर भरदुपारी विद्यार्थ्यांमध्ये पाऊन तास हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. उल्लेखनीय म्हणजे एवढ्या गंभीर घटनेचा पोलिसांना सुगावा देखील लागला नाही.

विद्यार्थ्यांमधील हाणामारीचे सीसीटिव्ही मध्ये कैद झालेले दृष्य
author img

By

Published : Jun 20, 2019, 6:36 PM IST

नाशिक- सिडको परिसरातील उत्तम नगर येथील के. एस. के. डब्ल्यू कॉलेजच्या बाहेर भरदुपारी विद्यार्थ्यांमध्ये पाऊन तास हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. उल्लेखनीय म्हणजे एवढ्या गंभीर घटनेचा पोलिसांना सुगावा देखील लागला नाही.

विद्यार्थ्यांमधील हाणामारीचे सीसीटिव्ही मध्ये कैद झालेले दृष्य

के एस के डब्ल्यू कॉलेजच्या बाहेर भर रस्त्यात मुला-मुलींमध्ये शिवीगाळ सुरू होती. शिवीगाळीवरून सुरू झालेला हा वाद इतका पेटला की कॉलेजच्या उत्तम नगर येथील गेट पासून ते राजरत्न नगरपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. ही भीषन हाणामारी पाहायला यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. मात्र, पाऊन तास हाणामारी होत असताना देखील पोलिसांना या घटनेचा सुगावा लागला नाही. मुलीच्या प्रकरणावरून हा वाद झाल्याचे समजते आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मुलींनी महाविद्यालयात जाऊन चांगले शिक्षण घ्यावे अशी पालकांची अपेक्षा असताना या घटनेमुळे के. एस. के. डब्ल्यू कॉलेजचे चित्र मात्र वेगळेच असल्याचे दिसत आहे.

सिडको परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. या भागातील गुन्हेगारीने तोंड वर काढले असून रोज कुठे ना कुठे वेगवेगळ्या घटनांमधून गुन्हेगार पोलिसांना आव्हान देत आहेत. सध्या वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्या आहे. त्यामुळे कॉलेज आवारात वर्दळ दिसून येते. यात टवाळखोर मुलांची संख्या जास्त असते. यावरूनच भांडणांचे प्रकार घडू लागले आहेत.

Intro:नाशिक मधील सिडको कॉलेजबाहेरील आवारात रस्त्यावर मुलांच्या टोळक्याची भांडणे हा काही नवीन प्रकार नाही मात्र भररस्त्यावर मुलं आणि मुलींमध्ये भांडण जुंपतात आणि प्रकरण थेट हाणामारी व शिवीगाळापर्यंत जातं तेव्हा पाहणारे देखील हाबकून जातात

Body:सिडकोतील उत्तम नगर ते राजरत्न नगर भागात हाणामारीचा प्रकार भर दिवसात घडला के एस के डब्ल्यू कॉलेजच्या बाहेर भरदुपारी विद्यार्थ्यांमध्ये पाऊन तास हाणामारी होत असताना साधा पोलिसांना सुगावा देखील लागला नाही भर रस्त्यात मुला-मुलींमध्ये शिवीगाळ सुरू होती शिवीगाळ वरून हा वाद इतका पेटला की कॉलेजच्या उत्तम नगर येथील गेट पासून ते राजरत्न नगर पर्यंत तुफान हाणामारी सुरू होती यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती मुलीच्या प्रकरणावरून हा वाद झाल्याचं समजतं या प्रकरणामुळे आता पालकांमध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले असून मुलींनी शालेय महाविद्यालयात जाऊन चांगले शिक्षण घ्यावे अशी पालकांची अपेक्षा असताना सिडको तील चित्र मात्र वेगळेच आहे

Conclusion:सिडको दिवसेंदिवस वाढत चालणाऱ्या गुन्हेगारी घटनांनी या भागातील गुन्हेगारीने तोंड वर काढले आहे तर रोज कुठे ना कुठे वेगवेगळ्या घटनांमधून गुन्हेगार पोलिसांना आव्हान देत आहेत
सध्या वेगवेगळ्या शाखांमध्ये अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्या आहे त्यामुळे कॉलेज आवारात वर्दळ दिसून येते यात टवाळखोर मुलांची संख्या जास्त असते यावरूनच भांडणांचे प्रकार घडू लागले आहेत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.