ETV Bharat / state

Strike of Onion Traders : कांदा व्यापाऱ्यांच्या बेमुदत बंदचा शेतकऱ्यांना फटका; नाशिकातील सर्व बाजार समित्या बंद - कांदा व्यापारी संघटना

Strike of Onion Traders : कांदा व्यापाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या व समस्यांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही. यामुळं नाशिक जिल्ह्यातील सर्व १५ बाजार समिती व उपबाजार समितीत व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारलाय. शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे.

Strike of Onion Traders
Strike of Onion Traders
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 20, 2023, 12:17 PM IST

नाशिकातील सर्व बाजार समित्या बंद

मनमाड (नाशिक) Strike of Onion Traders : नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांच्या मागण्या व समस्यांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही. यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व १५ बाजार समिती व उपबाजार समितीत व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारलाय. या बंदाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती त्यात शेतमालाला नसलेला भाव यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा नवीन संकट येऊन ठेपलंय. ( Market Committees in Nashik Closed )

जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत तोडगा नाही : कांद्याच्या निर्यातीवर लावण्यात आलेले 40 टक्के निर्यातशुल्क यासह इतर मागण्यांसाठी कांदा व्यापाऱ्यांनी मागील काही दिवसांपासून आंदोलन केलं होतं. तसंच बाजार समित्यांनी लाक्षणिक बंदही पुकारला होता. त्यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मध्यस्थी केल्यानं आंदोलन मागे घेण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतरही व्यापाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित राहिल्या होत्या. यासाठी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक झाली, त्यातही तोडगा न निघाल्याने आज अखेर जिल्ह्यातील सर्व 15 बाजार समित्या तसंच उपबाजार समितीतील व्यापाऱ्यांकडून बेमुदत बंद पुकारण्यात आलाय. याचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती असून त्यात कांद्यासह शेतमालाचा कमी झालेला भाव यातून कसा मार्ग काढावा यामुळं शेतकरी संकटात सापडला असताना आता बाजार समिती बंद असल्याने बळीराजा हतबल झालाय. ( Farmers hit by indefinite strike of onion traders )

मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत संप : केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्क्यांपर्यंत निर्यातशुल्क लावले आहे. यासह नाफेडचा कांदा देखील खरेदी करुन तो बाजारात आणला आहे. यामुळे इथे महाग कांदा घेऊन तो कांदा परराज्यात कमी पैशात विकावा लागतो. यामुळे व्यापारी वर्गाचं देखील नुकसान होत आहे. म्हणून आम्ही आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत बंद पुकारलाय, असा पवित्रा कांदा व्यापारी संघटनेनं घेतलाय.

हेही वाचा :

  1. Nashik Onion Subsidy : नाशिक जिल्ह्यात कांदा अनुदानासाठी 1 लाख 72 हजार शेतकरी पात्र; 453 कोटी 61 लाखांचं लवकरच होणार वाटप
  2. Onion Farmers Issue : केंद्र सरकार २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार, पियूष गोयल यांचे धनंजय मुंडेंना आश्वासन
  3. Onion Seller Farmers : नाफेडने कांदा खरेदीसाठी लादल्या जाचक अटी; शेतकरी अडचणीत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.