नाशिक : भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्ष हा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. आपल्या पूर्वजांच्या नावे श्राद्ध करून पितर जेवायला घातले म्हणजे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते, हा यामागचा समज आहे. यंदा 20 सप्टेंबर पासून 6 ऑक्टोबर दरम्यान पितृपक्ष आहे. या कालावधीत केले जाणारे पिंडदान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. ते स्वर्गात असलेल्या पूर्वजांपर्यंत पोहोचते असा समज आहे.
पितरांसाठी करावयाच्या गोष्टी
सर्वप्रथम आपल्या पूर्वजांच्या इच्छेनुसार दान पुण्य करावे. या काळात गाईला दान करावे. तूप, चांदी, पैसा, फळ, मीठ, तीळ, कपडे आणि गुळाचे दान करावे. या दानाचा संकल्प केल्यानंतर आपल्या ब्राम्हणा द्यावे. श्राध्द काळात हे दान तिथीनुसार करावे. असे केलं तर पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो अशी मान्यता आहे.
पितरांकडे प्रार्थना करा
कुठल्याही कारणाने आपल्या हातून चुक झाली तर त्यासाठी पितरांकडे माफी मागावी. त्यांच्या फोटोला टिळा लावावा. तसेच पितृपक्ष काळात रोज फोटोला टिळा लावून तेलाचा दिवा लावावा. त्यांच्या तिथीनुसार अन्न दान करावे. आपल्या चुकांचा स्वीकार करून त्यांच्याकडे माफी मागावी. हे केल्यावर त्यांचा आशीर्वाद आपणास प्राप्त होतो.
पितृपक्ष म्हणजे काय?
पितृपक्षास हिंदू धर्मात विशेष महत्त्व देण्यात आले आहे. भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षास पितृपक्ष या नावाने संबोधण्यात येते. या पंधरवड्यात नागरिक दिवंगत आप्तांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध, तर्पण विधि करतात. ज्यात कुत्रा, गाय आणि कावळा यांना विविध खाद्यपदार्थ खाऊ घालण्याची प्रथा आहे. त्यांना खाऊ घालण्यात आलेले पदार्थ पितरांपर्यंत पोहोचतात आणि आत्म्याची तृप्ती होते, त्यांना शांती मिळते, असा समज आहे. पितरांच्या मृत्यूतिथीनुसार श्राद्धकर्म करण्यात येते. जर एखाद्या पित्राची मृत्युतिथी माहीत नसेल तर पाच वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सर्वपित्री अमावस्याला सर्व पितरांचे श्राद्ध कर्म होऊ शकते.
हेही वाचा - VIDEO : 25 सप्टेंबर राशीभविष्य - कसा असेल तुमचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य