ETV Bharat / state

तारवालानगरमध्ये एकाच रात्रीत चार घरांमध्ये चोरी - नाशिक

नाशिक पंचवटी परिसरात नागरिक बाहेरगावी गेल्याचे पाहून एकाच रात्रीत चार सदनिकांचे (फ्लॅट) कुलूप तोडून चोरट्यांनी किमती ऐवज लंपास केला.

नाशिक
author img

By

Published : May 13, 2019, 7:24 PM IST

नाशिक - तारवालानगर मधील शिवशक्ती संकुल, मातृछाया, वृंदावन अशा चार गृहसंकुलातील फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केली. चोरी करताना चोरट्यांनी लहान मुलांनी जमा केलेल्या पिगीबँकमधील पैसेही चोरून नेले. घरफोडी करून लूटमार केल्याने नागरिकांनी निष्क्रीय पोलीस प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला.

मध्यरात्री रात्री तीन वाजण्याच्या सुमारास तारवालानगर परिसरात असणाऱ्या शिवशक्ती संकुल मधील अनिल महादेव सानप, अमर अशोक बोडके, मातृछाया सोसायटी मधील सौरभ शामकांत जोशी तर वृंदावन सोसायटीमधील अभिजित देसाई यांच्या मालकीच्या फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी डल्ला मारला.

सौरभ शामकांत जोशी यांच्या घरातील 600 रुपये चोरट्यांनी लंपास केले. मात्र, घरातील लॅपटॉप, मोबाईल, दागिने आणि इतर साहित्याला चोरट्यांनी हात लावला नाही. अभिजीत देसाई यांच्या घराचे कुलूप तोडण्याचा आवाज शेजारी राहणाऱ्या प्रवीण शिंदे कुटुंबीयांना लागताच त्यांनी पोलिसांना फोन केला. काहीतरी गडबड होत असल्याचे लक्षात येताच या ठिकाणाहून चोरट्यांनी पळ काढला. अमर अशोक बोडके हे गावाला गेले असून त्यांच्या घरातून वीस हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. तर महादू सानप यांच्या घरातील लहान मुलांच्या पैसे साठवण्याच्या तीन पिगी बँकवर देखील चोरट्यांनी डल्ला मारत 25 ते 30 हजार रुपयांवर हात साफ केला. तसेच घरातील कपाटात ठेवलेली जवळपास 43 हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली.

याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पंचवटी परिसरात यापूर्वी देखील अनेक घरफोड्या झाल्या आहेत. अद्याप देखील त्यांचा छडा लागलेला नाही. तारवालानगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडी आणि वाहन चोरीचे सत्र सुरूच असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यातील एकाही गुन्ह्याचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले नसल्याने नागरिकांमध्ये मोठी नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

Intro:नाशिक पंचवटी परिसरात नागरिक बाहेरगावी गेल्याचे पाहून एकाच रात्रीत चार प्लँटचे कुलूप तोडून चोरट्यांनी किमती ऐवज लंपास केलाय..

Body:तारवाला नगर मधील शिवशक्ती संकुल, मातृछाया, वृंदावन असे चार फ्लॅटचे कुलूप तोडुन चोरट्यांनी चोरी केलीय चोरी करताना चोरट्यांनी लहान मुलांनी जमा केलेली पिगीबँक मधील पैसेही चोरून नेले घरफोडी करून लूटमार केल्याने नागरिकांमध्ये झोपलेल्या पोलिस प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केलाय..
मध्यरात्री रात्री तीन वाजेच्या सुमारास तारवाला नगर परिसरात असणाऱ्या शिवशक्ती संकुल मधील अनिल महादेव सानप अमर अशोक बोडके मातृ छाया सोसायटी मधील सौरभ शामकांत जोशी तर वृंदावन सोसायटीमधील अभिजित देसाई यांच्या मालकीचे चार फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी आपला धुमाकूळ घातला आहे

Conclusion:सौरभ शामकांत जोशी यांच्या घरातील रोख 600 रुपयांची चोरट्यांनी लंपास केली मात्र घरातील लॅपटॉप मोबाईल चे दागिने आणि इतर साहित्याला चोरट्यांनी हात लावला नाही अभिजीत देसाई यांच्या घराचे कुलूप तोडण्याचा आवाज शेजारी राहणा-या प्रवीण शिंदे कुटुंबीयांना लागताच त्यांनी पोलिसांना फोन केला काहीतरी गडबड होत असल्याचे लक्षात येताच या ठिकाणाहून चोरट्यांनी पळ काढला अमर अशोक बोडके हे गावाला गेले असून त्यांच्या घरातून वीस हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे तर आणि महादू सानप यांच्या घरातील लहान मुलांचे पैसे साठवण्याच्या तीन पिगी बँक वर देखील चोरट्यांनी डल्ला मारत 25 ते 30 हजार रुपयांवर हात साफ केला आहे तसेच घरातील कपाटात ठेवलेली जवळपास 43 हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली असून याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असुन पंचवटी परिसरात यापूर्वी देखील अनेक घरफोड्या झाल्या असून अद्याप देखील त्यांचा छडा लागलेला नाही हे विशेष असून तारवाला नगर परिसरात गेल्या काही दिवसापासून घरफोडी आणि वाहन चोरीचे सत्र सुरूच असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे यातील एकाही गुन्ह्याचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले नसल्याने नागरिकांमध्ये मोठी नाराजी दिसून येत आहे त्यामुळे रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून एकीकडे रस्त्यावर पोलिसांकडून हेल्मेट सक्ती च्या नावाखाली आर्थिक लूट करण्यात येत आहे तर दुसरीकडे चोरट्यांनी घरफोडी करीत आर्थिक लूट सुरू केल्याने नागरिक दुहेरी संकटात सापडले असल्याची भावना व्यक्त केली जात आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.