ETV Bharat / state

मका खरेदीस मुदतवाढ द्या... छगन भुजबळांची केंद्र सरकारकडे मागणी - Chhagan Bhujabal news

केंद्र सरकारने महाराष्ट्र शासनाला 'खरीप पणन हंगाम 2019-20 अंतर्गत 0.15 लाख मे.टन ज्वारी आणि 0.25 लाख मे.टन मका खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. खरेदीची अंतिम मुदत 30 जून आहे.

state-government-demand-to-extend-the-purchase-of-makka-to-central-goverment
मका खरेदीस मुदतवाढ द्या...
author img

By

Published : Jun 24, 2020, 12:27 PM IST

Updated : Jun 24, 2020, 6:41 PM IST

नाशिक - यावर्षी पीक पद्धतीत बदल करून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मक्याचे पीक घेतले. शेतकऱ्यांना उत्पन्नही चांगले मिळाले. मात्र, केंद्र शासनाने दिलेले 0.25 लाख मे.टन मका खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे मका खरेदी बंद झाली आहे. त्यामुळे मका खरेदी केंद्रे पुन्हा सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

या मागणीची दखल घेत राज्य सरकासने मका खरेदीस 15 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याची तसेच खरेदी क्षमतेत वाढ करून ती नऊ लाख मे.टन करण्याची मागणी केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाकडे केली आहे, अशी माहिती अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

केंद्र सरकारने महाराष्ट्र शासनाला 'खरीप पणन हंगाम 2019-20 (रब्बी)' अंतर्गत 0.15 लाख मे.टन ज्वारी (हायब्रीड) आणि 0.25 लाख मे.टन मका खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. खरेदीची अंतिम मुदत 30 जूनपर्यंत आहे. राज्याला दिलेले 0.25 लाख मे.टन मका खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यामुळे राज्यातील मका खरेदी केंद्र बंद करण्याची वेळ आली आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची मका शिल्लक असल्याने, राज्य मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ यांचे किमान आधारभूत शासकीय खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी होत आहे.

यावर्षी पीक पद्धतीतील बदलांमुळे मोठ्या प्रमाणावर मक्याचे पीक घेतले गेले असून, उत्पादन मोठ्या प्रमाणात निघाले आहे. त्यामुळे मका खरेदीसाठी उद्दिष्टांत वाढ करून हे उद्दिष्ट नऊ लाख मेट्रिक टन करुन मका खरेदीची मुदत १५ जुलैपर्यंत वाढविण्यात यावी, अशी मागणी राज्य शासनाने केंद्राकडे केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण मका खरेदी करण्यासाठी राज्याची मागणी मान्य करावी, यासाठी छगन भुजबळ यांनी केंद्र शासनाकडे संपर्क केला आहे.

Last Updated : Jun 24, 2020, 6:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.