ETV Bharat / state

येवल्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता 'डोअर टू डोअर' तपासणी करा - छगन भुजबळ

कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या परिस्थितीत लोक आपल्यापर्यंत येण्याअगोदरच त्यांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात यावी. तपासणीची संख्या वाढविण्यात यावी. त्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाला प्रशिक्षण, पुरेसे सॅनीटायझर, हॅण्डग्लोज सह आवश्यक साहित्याचा पुरवठा करावा. लो रिस्क आणि हाय रिस्क रुग्णांचे अहवाल येईपर्यंत त्यांना होम क्वारंटाईन करण्याऐवजी त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात यावे, आदी सूचना मंत्री भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

minister chhangan bhujbal during meeting in yeola nashik
येवला येथील बैठकीत मंत्री छगन भुजबळ.
author img

By

Published : Jun 15, 2020, 4:15 PM IST

Updated : Jun 15, 2020, 5:27 PM IST

येवला (नाशिक) - येवल्यात वाढती रुग्ण संख्या बघता तपासणी पथके करून तातडीने 'डोअर टू डोअर' स्क्रिनिंग करण्याचे आदेश, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. तसेच सर्वे करताना केवळ मलमपट्टी नको तर तपासणीतून प्रत्यक्ष निष्कर्ष द्या, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.

येवल्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता 'डोअर टू डोअर' तपासणी करा - छगन भुजबळ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि नियोजनाबाबत आज (सोमवारी) मंत्री छगन भुजबळ यांनी येवला संपर्क कार्यालय येथे आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपील आहेर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, प्रांताधिकारी सोपान कासार, तहसीलदार रोहिदास वारुळे, पोलीस उपअधीक्षक समरसिंग साळवे, गटविकास अधिकारी डॉ उमेश देशमुख, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.शैलजा कृपास्वामी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एच.आर. गायकवाड, डॉ. सूर्यवंशी, शहर पोनि संदीप कोळी, तालुका पोनि अनिल भवारी, सहायक निबंधक एकनाथ पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या परिस्थितीत लोक आपल्यापर्यंत येण्याअगोदरच त्यांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात यावी. तपासणीची संख्या वाढविण्यात यावी. त्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाला प्रशिक्षण, पुरेसे सॅनीटायझर, हॅण्डग्लोज सह आवश्यक साहित्याचा पुरवठा करावा. लो रिस्क आणि हाय रिस्क रुग्णांचे अहवाल येईपर्यंत त्यांना होम क्वारंटाईन करण्याऐवजी त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात यावे, आदी सूचना मंत्री भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर येवला शहरातील स्वच्छता तसेच आवश्यक औषध फवारणी करण्यात यावी, असे आदेशही मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. समन्वय आणि नियोजनाचा अभाव होता कामा नये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामकाजात दिरंगाई होणार नाही, याची दक्षता घ्यावी. शहरातील गर्दी टाळण्यासाठी दुकानांना वेळ वाढून द्यावी. तसेच यावर पोलिसांनी नियंत्रण ठेवावे, अशा सूचना भुजबळ यांनी दिल्या. त्याचबरोबर शेतकरी पीक कर्जाबाबत आढावा घेत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज वाटप करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी मका खरेदी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात येऊन सर्व शेतकऱ्यांची संपुर्ण मका खरेदी करण्यात यावी, असे आदेश त्यांनी यावेळी दिले.

Last Updated : Jun 15, 2020, 5:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.