ETV Bharat / state

ST Workers Strike : नाशकात एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकार विरोधात 'मुंडण आंदोलन' - एसटी कर्मचाऱ्यांचे 'मुंडण आंदोलन'

सरकार त्यावर तोडगा काढत नसल्याच्या निषेधार्थ एसटी कर्मचाऱ्यांनी शहरात आज (मंगळवारी) 'मुंडण आंदोलन' करुन निषेध नोंदवला आहे. दरम्यान तिसऱ्या दिवशी देखील नाशिक जिल्ह्यातील एकाही डेपोमधून बस बाहेर पडली नाही.

मुंडण
मुंडण
author img

By

Published : Nov 9, 2021, 7:37 PM IST

Updated : Nov 9, 2021, 7:46 PM IST

नाशिक - एसटी कर्मचार्‍यांचा संप चिघळत असून शासनामध्ये महामंडळाचे विलीनीकरण करा, ही मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी लावून धरली आहे. सरकार त्यावर तोडगा काढत नसल्याच्या निषेधार्थ एसटी कर्मचाऱ्यांनी शहरात आज (मंगळवारी) 'मुंडण आंदोलन' करुन निषेध नोंदवला आहे. दरम्यान तिसऱ्या दिवशी देखील नाशिक जिल्ह्यातील एकाही डेपोमधून बस बाहेर पडली नाही.

एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकार विरोधात 'मुंडण आंदोलन'

'...तोपर्यंत संप मिटणार नाही'

ऐन दिवाळीत एसटी संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. संप चिघळत असला तरी शासन निर्णय घेण्यास तयार नाही. त्यामुळे एसटी कामगार आक्रमक झाले आहे. एसटी महामंडळाचे जो पर्यंत शासनात विलीनीकरण केले जात नाही, तोपर्यंत संप मिटणार नाही, असा इशाराच कर्मचारी संघटनांनी दिला आहे.

जिल्ह्यातील 13 आगारांच्या सेवकांचा संपात सहभाग

जिल्ह्यातील 13 आगारांच्या सेवकांनी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. दिवाळीच्या सणात राज्य परिवहन महामंडळाच्या सेवकांनी घेतलेल्या निर्णयामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. रविवारी संध्याकाळी पुकारलेला संप हा मंगळवारी तिसऱ्या दिवशीही सुरू होता‌. बंद पुकारला गेल्यामुळे प्रवाशांना बाहेर गावी जाणे मुश्कील होऊन बसले आहे. शहरातील मध्यवर्ती बस स्थानक, महामार्ग, ठक्कर बाजार या बस स्थानकावर आल्यावर बसचा संप असल्याचे अचानक समजल्यानंतर प्रवाशांना पुढील प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. यामध्ये महिला बालकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. मात्र मंगळवारी हे प्रमाण कमी होते. नागरिक आपल्या खासगी वाहनाने किंवा ट्रॅव्हलच्या वाहनाने प्रवास करताना दिसून येत होते. पंचवटी येथील परिवहन महामंडळाच्या मुख्यालय बाहेर वेगवेगळे संघटनांकडून धरणे आंदोलन सुरू आहेत. या आंदोलनाला वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी देखील आपले समर्थन दिले आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये संप पुकारल्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शासनाचा निषेध करत यावेळी बोलताना कर्मचाऱ्यांनी सांगितले, की शासन राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना विनाकारण वेठीस धरत आहे. त्यांची मागणी जर पूर्ण झाली तर आंदोलन एका मिनिटात मागे घेतले जाऊ शकते, अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली आहे.

हेही वाचा - VIDEO : एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपेना; प्रवाशांचे हाल सुरूच

Last Updated : Nov 9, 2021, 7:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.