नाशिक : पुण्यात शिवशाही बसला आग (Shivshahi bus caught fire) लागण्याची घटना ताजी असताना. नाशिक - पुणे महामार्गावर ( Nashik Pune Highway ) एसटी महामंडळाच्या शिवशाही बसने अचानक पेट घेतला. ड्रायव्हर, कंडक्टरने प्रसंगावधान दाखवत सर्व प्रवाशांना खाली उतरवल्यामुळे मोठा अनर्थ ठरला. एसटी महामंडळाच्या बसला वारंवार लागणाऱ्या आगीमुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होत आहे.
शिवशाही बस सिन्नर जवळ येताच अचानक गाडीतून धूर : नाशिकहून पुण्याकडे येणाऱ्या (mh 04 bw 0640) या क्रमांकाची शिवशाही बस सिन्नर जवळ येताच अचानक गाडीतून धूर येत असल्याचे लक्षात आल्यानंतर ड्रायव्हर आणि कंडक्टरने बस रस्त्याच्या कडेला उभी केली. सर्व प्रवाशांना खाली उतरवले, त्यामुळे मोठ्या अनर्थ टळला आणि काही क्षणात पूर्ण बस जळून खाक झाली, नंतर अग्निशामक बंबाच्या मदतीने ही आग विझविण्यात आली, या घटनेमुळे बसमधील अनेक प्रवाशी भीतीच्या सावटा खाली होते.
पुण्यातील येरवडा परिसरामध्ये घडलेली घटना : पुण्यातील येरवडा येथील शास्त्रीनगर येथे एका शिवशाही बसला आग लागल्याची घटना Shivshahi Bus Caught Fire Fire Breaks Out घडली आहे. गाडी खराब झाल्याने चालकाने गाडी बाजूला घेऊन उभी केली होती. गाडीतील 42 प्रवाश्यांना खाली उतरवल्यानंतर गाडीने अचानक पेट घेतल्याची माहिती मिळत आहे. तर चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधामुळे मोठी दुर्घटना टळली असून सर्व प्रवाशी सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती आहे. यवतमाळ ते चिंचवड या मार्गावर धावणाऱ्या एस. टी. विभागाच्या शिवशाही बसने पेट घेतला असून यातील सर्व प्रवासी हे सुखरूप आहे. येरवडा येथील शास्त्रीनगर येथे गाडी आल्यावर गाडी खराब झाली म्हणून चालकाने गाडी बाजूला लावून बस मधील 42 प्रवाशांना खाली उतरविले आणि त्यानंतर अचानक बसने पेट घेतली आहे. अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.