ETV Bharat / state

त्र्यंबकेश्वरच्या श्री पंचायती आखाडा आनंद सन्यासी संस्थेतून विद्यार्थ्यांना आध्यात्मिक शिक्षणाचे धडे - trbykaeshwar latest news

हिंदू धर्मात आखाड्यांना विशेष महत्व दिले जाते. नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथील श्री पंचायती आखाड्यासही महत्व प्राप्त आहे. अत्यंत प्राचिन आखाडा म्हणून ओळख असलेल्या या आखाड्यामधून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत अध्यात्मिक शिक्षण ही दिले जाते.

विद्यार्थ्यांना आध्यात्मिक शिक्षणाचे धडे

author img

By

Published : Dec 10, 2020, 9:05 AM IST

Updated : Dec 10, 2020, 10:07 AM IST

नाशिक - भारतात एकूण 13 प्रमुख आखाडे असून यामध्ये त्र्यंबकेश्वर येथील 'श्री पंचायती आखाडा आनंद सन्यासी' हा एक आखाडा अत्यंत प्राचीन संस्था म्हणून ओळखला जातो. या संस्थानचे प्रमुख स्थान कपिलधार पंचकोशी तीर्थ येथे आहे. भारतात हिंदू धर्माचा प्रचार प्रसार व्हावा हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. या आखाड्यात विद्यार्थ्यांना आध्यत्मिक शिक्षण दिले जाते.

विद्यार्थ्यांना आध्यात्मिक शिक्षणाचे धडे
विद्यार्थ्यांना आध्यात्मिक शिक्षणाचे धडे
श्री पंचायती आखाडा आनंद सन्यासी दिगंबर नागा दशनामी संन्यासी ही प्राचीन संस्था आहे. भारतात अनेक ठिकाणी या संस्थेच्या शाखा असून या संस्थेमार्फत धर्म प्रचार आणि जनसेवा केली जाते. प्रयाग, हरिद्वार, उज्जेन आणि त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळा दरम्यान इतर आखाड्या बरोबरच या संस्थेचे अपूर्व आध्यात्मिक महत्व आणि कार्य प्रकर्षाने दिसून येते. कुंभमेळा दरम्यान श्री निरंजन आखाडा पंचायती दशनामी समप्रदाय या संस्थे बरोबर श्री पंचायती आखाडा आनंद सन्यासी ही संस्था धार्मिक कार्य करते.
आनंद सन्यासी संस्थेतून विद्यार्थ्यांना आध्यात्मिक शिक्षणाचे धडे
सूर्यनारायण आहे दैवत-

श्री पंचायती आखाडा आनंद सन्यासीचे 'सूर्यनारायण' हे दैवत आहे. आखाड्यात युद्ध करण्याची शक्ती आणि मनोबल सूर्य देवता देते अशी मान्यता असून हिंदू धर्माची रक्षा या आखाड्याचा मुख्य उद्देश आहे. या आखाड्यात अनेक प्रसिद्ध महात्मा झाले असून त्यांनी अनेक अदभुत चमत्कार केल्याचे सांगितले जाते. महंत शिवरमपुरी जी, महंत नारायणगिरी जी, यांच्यासारख्या अनेक महंतांनी हा आखाडा उभा करण्यासाठी कार्य केले आहे. सुरुवातीला या आखाड्याचे अध्यक्षपद हे श्री महंत रामनारायण गिरी यांच्याकडे होते. त्यानंतर सद्यस्थितीत त्र्यंबकेश्वर येथील श्री महंत सागरानंद सरस्वती हे अध्यक्ष म्हणून आखड्याची जबाबदारी सांभाळत आहेत.

श्री पंचायती आखाडा आनंद सन्यासी संस्थेचे कार्य..

  • नागा साधूंची ही प्राचीन संस्था आहे..
  • हिंदू धर्म ,भारतीय संस्कृती,वाङ्मयम्य तसेच साधूंच्या धर्माची रक्षा करणे आणि देश विदेशात जाऊन हिंदू धर्मचा प्रचार प्रसार करणे..
  • कुंभमेळा आणि धार्मिक कार्यक्रमात येणाऱ्या साधू महंत, ब्रम्हचारी आदींची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करणे..
  • प्राचीन नियमानुसार श्री रमता पंच चे धर्म प्रचारार्थ आणि जगाच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हिंदू धर्मचा प्रचार प्रसार करणे..

विद्यार्थ्यांना दिले जातात अध्यात्मिक धडे -

त्र्यंबकेश्वर येथील श्री पंचायती आखाडा आनंद सन्यासी संस्थेची भव्य इमारत असून इथे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत आध्यत्मिक शिक्षण दिले जाते. या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आध्यत्मिक शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत असतात. या आखाड्यात विद्यार्थ्यांना राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था संस्था करते. सकाळी पाच वाजता विद्यार्थ्यांची दिनचर्या सुरू होते. सहा वाजता महाआरती केली जाते. सात वाजता विद्यार्थ्यी शाळेत जातात. त्यानंतर दुपारच्या जेवणानंतर विद्यार्थ्यांना अध्यात्मिक शिक्षण दिले जाते. त्यामध्ये भगवतगीता, प्रवचन, कीर्तन आणि सामुदायिक हरिपाठाचा समावेश असतो. त्यानंतर शरीर स्वस्थासाठी योगा, प्राणायामाचे धडे विद्यार्थ्यांना दिले जातात. तसचे रात्री आठ वाजताच्या जेवणानंतर विद्यार्थांकडून शालेय अभ्यास करवून घेतला जातो.

Last Updated : Dec 10, 2020, 10:07 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.