नाशिक - "देव तारी त्याला कोण मारी "असे म्हटले जाते. याचा प्रत्यय मनमाड रेल्वे स्थानकावरील एका प्रवाशाला आला. धावती रेल्वे पकडण्याच्या नादात एक तरुण प्रवासी खाली पडून डब्बा व प्लॅटफॉर्मच्यामध्ये अडकून फरफटत जात होता. तेवढ्यात प्लॅटफॉर्मवर ड्यूटीवर असलेल्या मनीष कुमार सिंग या जवानांनी तातडीने धाव घेतली व या प्रवासाला रेल्वेखाली जात असताना बाहेर ओढून काढले. त्यामुळे त्या तरुणाचा जीव वाचला.
मुनीर बागवान असे या प्रवाशाचे नाव आहे. ते परभणी येथून कल्याणला जात होते. हा सर्व थरार रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. रेल्वे डब्बा आणि प्लॅटफार्ममध्ये अडकल्यामुळे या प्रवासाच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आला. प्रसंगी जवानाच्या कर्तबगारीचे कौतूक करण्यात आले.