नाशिक - कॉलेज परिसरातील डिसुजा कॉलनीतील जुने आंब्याचे झाड एका अनोळखी इसमाने कटरच्या सहाय्याने कापले. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला. भर रस्त्यावर वृक्षांची अशा प्रकारे कत्तल होत असल्याने वृक्ष प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.
30 वर्षे जुन्या झाडाची कत्तल
शहरातील उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॉलेज रोडवरील डिसूजा कॉलनीतील 30 वर्षाहून अधिक जूने असलेल्या आंब्याच्या झाडाची रविवारी पहाटे अज्ञातांकडून कत्तल करण्यात आली. हा सर्व प्रकार या परिसरातीलच एका सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला आहे. विशेष म्हणजे पहाटे काही मिनिटातच ही कत्तल करण्यात आल्याने नाशिकमध्ये हा चर्चेचा विषय ठरत आहे. पोलीस आणि महापालिका वृक्ष प्राधिकरण विभाग या सर्व घटनेचा सध्या तपास करत आहे.
पर्यावरण प्रेमी संतप्त
या घटनेवर वृक्ष प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी रवींद्रसिंग यांनी पोलिस आणि महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण व अग्निशमन विभाग माहिती दिली. तेव्हा अग्निशमन दलाने झाडाच्या फांद्या कापून झाड रस्त्यावरून बाजूला करत रहदारीचा मार्ग मोकळा करुन निघून गेले, असे वृक्ष प्रेमी रवींद्रसिंग साहनिक यानी सांगितले.
हेही वाचा - राज्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज