ETV Bharat / state

नाशिक जिल्ह्यात कोरोनामुळे एकाच दिवसात 6 बळी - नाशिक कोरोना रुग्ण संख्या

आज नाशिक शहरासह जिल्ह्यातील मालेगावात 6, तर मनमाडमध्ये 9 रुग्ण वाढले आहेत. तसेच बागलाण तालुक्यात आज दोन रुग्ण वाढले असून, जायखेडा आणि सटाणा येथील रुग्णांचा समावेश आहे.

Nashik civil hospital
नाशिक जिल्ह्यात कोरोनामुळे एकाच दिवसात 6 बळी
author img

By

Published : Jun 13, 2020, 12:15 PM IST

नाशिक - जिल्ह्यात एका दिवसात 64 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता 1 हजार 822 वर पोहोचली आहे. तर एकट्या नाशिक शहरात आज दिवसभरात 39 रुग्णांची भर पडली असून रुग्णसंख्या 327 वर पोहोचली आहे. एकाच दिवसात 6 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूची संख्या 115 वर पोहोचली आहे.

आज नाशिक शहरासह जिल्ह्यातील मालेगावात 6, तर मनमाडमध्ये 9 रुग्ण वाढले आहेत. तसेच बागलाण तालुक्यात आज दोन रुग्ण वाढले असून, जायखेडा आणि सटाणा येथील रुग्णांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार जिल्ह्याभरात नव्याने 64रुग्णांची भर पडली. यामध्ये एकट्या नाशिक शहरात 39 अहवाल आहेत. यात पंचवटी 5, पेठरोड 3, जाचकमळा, नाशिकरोड 2, द्वारका 1,सुभाषरोड, 4, जुने नाशकातील बागवानपुरा 3, कथडा 1, अझाद चौक 2, मायको दवाखाना 1, कमोदरोड 1, पाथर्डीफाटा 2 येथील रुग्णांचा सामावेश आहे.

ग्रामीण भागात 19 रूग्ण आढळले आहेत. यामध्ये मनामड 8, येवला 2, पिंपळगाव बसवंत 2, मडसांगवी 1, ईगतपुरी 2, मोखाडा 1, भोरी कॅम्प 1 या रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे ग्रामीण भागातील रूग्णांचा आकडा 306 झाला आहे. तर मालेगावात 4 रूग्ण आढळले असून मालेगावचा आकडा 871 वर गेला आहे.कोरोनामुळे आज 6 जणांचा मत्यू झाला. यामध्ये नाशिक शहरातील वडाळानाका येथील रेणुकानगर 1, येथीलच काळेचौक येथील 1 व एका रूग्णाचा आहे. यामुळे मृत्यूचा आकडा 115 झाला आहे.

तसेच जिल्ह्यात आज 49 रूग्ण कोरोना मुक्त झाले असून बरे होणारांचा आकडा 1 हजार 201 वर पोहचला आहे.

नाशिक जिल्ह्याची परिस्थिती -

-नाशिक जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्ण 1822
-कोरोनामुक्त 1201
-एकूण मृत्यू 115
-उपचार घेत असलेले रुग्ण 506
-मालेगावात 85
-शहरात 327
-ग्रामीण 80
-जिल्हा बाहेरील रुग्ण 14

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.