ETV Bharat / state

Manmad Crime : दारुड्या भावाच्या त्रासाला कंटाळून बहिणीने केला खून - बहिणीने केली दारुड्या भावाची हत्या

बहिणीने आपल्या दारुड्या भावाचा चाकू मारून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनमाड शहरातील विवेकानंद नगर नंबर 2 मध्ये ही घटना घडली आहे. भावाला मारून महिला स्वतःच पोलीस ठाण्यात हजर झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

Manmad Crime
घटनास्थळाची पाहणी करताना पोलीस
author img

By

Published : Apr 26, 2022, 7:31 PM IST

मनमाड(नाशिक) - एका बहिणीने आपल्या दारुड्या भावाचा चाकू मारून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनमाड शहरातील विवेकानंद नगर नंबर 2 मध्ये ही घटना घडली आहे. भावाला मारून महिला स्वतःच पोलीस ठाण्यात हजर झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला. याबाबत उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मनमाड शहरातील विवेकानंद नगर नंबर 2 भागात राहणाऱ्या संदीप उर्फ बाळू गोंघे या 45 वर्षीय व्यक्तीची 55 वर्षीय बहीण शोभा ही 15 एप्रिल रोजी राहण्यासाठी आली होती. मात्र, बाळू हा आपल्या बहिणीला कायम दारू पिऊन त्रास देत होता. तसेच चिडवत होता. आज सकाळी त्याने बहिणीला जाडी म्हणून चिडवले. याचा राग येऊन शोभाने किचनमधील चाकूने बाळूवर वार केला. तो वार बरोबर छातीच्या मधोमध लागला व यात त्याच्या लिव्हरला दुखापत होऊन तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. अतिरक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर शोभा ही स्वतःच पोलीस ठाण्यात येऊन हजर झाली व घडलेला प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य ओळखुन सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व पाहणी करून पंचनामा केला. या घटनेची माहिती मिळताच मनमाड उपविभागीय पोलीस अधीक्षक समिरीसिंह साळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पुढील कारवाईचे आदेश दिले.

आरोपीला उद्या कोर्टात हजर करणार- पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच गुन्ह्यात वापरलेले हत्यार जमा केले आहे. उद्या न्यायालयासमोर आरोपीला हजर करण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.