नाशिक - दिवसेंदिवस शहरात गुन्हेगारी वाढत असून यावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमे अंतर्गत शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाणे हद्दीतील 36 गुन्हेगारांच्या घरी छापे मारण्यात आले. या कारवाई दरम्यान, पोलिसांनी विविध ठिकाणाहून 20 गुन्हेगारांकडुन 37 शस्त्र जप्त केले असुन या संशयित गुन्हेगारांना अटककरुन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून,अनेक ठिकाणच्या गुन्ह्यात धारदार शास्त्राचा वापर केल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त दिपक पांडये यांच्या आदेशानुसार, शहरातील गुन्हेगारांच्या घरी एकाच वेळी 36 ठिकाणी छापे टाकण्यात आले तर 20 आरोपींकडे पोलिसांना 37 शस्त्र मिळून आलेत आहेत यामध्ये 1 गावठी कट्टा,5 जिवंत काडतुसे,10 तलवारी,10 कोयते,7 चॉपर, 2 चाकू यांचा समावेश आहे.
नाशिक शहरातील गंगापूर,अंबड,नाशिक रोड,पंचवटी, महसुळ,भद्रकाली, इंदिरा नगर,मुंबई नाका, उपनगर,देवळाली,सरकार वाडा,आडगाव,सातपूर आदी पोलीस ठाण्याअंतर्गत या कारवाया करण्यात आल्या.
या कारवाईत सुरज वर्मा,गणेश धात्रक,सोनल भडांगे,पप्पू भोंड,अविनाश कोलकर,अजय विराडे,रोहन शिंदे,सनी पाथरी,मकरंद देशमुख,अनिकेत तिजारे,कृष्णा वाळके,नुकूल परदेशी,बुऱ्हान पठाण,कुणाल साळवे,अक्षत ढोकोलिया,दिपक डोंगरे,शाहरुख शेख,सोनू अशोक,यश गरुड या संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या विरोधात आर्म अक्ट कलम 4/25 प्रमाणे अवैध रित्या हत्यारे बाळगल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईनतंर तरी शहरातील गुन्हेगारीला आळा बसेल अशी आशा सर्वसामान्य नागरिक वक्त करीत आहेत.