ETV Bharat / state

आंबे वरखेडा येथील दोन शाळकरी मुलांनी तयार केली इलेक्ट्रिक सायकल - आंबे वरखेडा सायकल न्यूज

लॉकडाऊन काळात प्रत्यक्ष शाळा बंद असल्याने सर्व विद्यार्थी घरीच होते. या वेळेचा काही मुलांनी अतिशय चांगला उपयोग करत नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात आणल्या आहेत. नाशिकमधील दोन भावंडांनीही वेळेचा आणि हुशारीचा उपयोग करून एक सायकल तयार केली आहे.

Krushna and Shivam
कृष्णा आणि शिवम
author img

By

Published : Dec 5, 2020, 4:15 PM IST

नाशिक - दिंडोरी तालुक्यातील आंबे वरखेडा येथील दोन शाळकरी मुलांनी इलेक्ट्रिक सायकल तयार केली आहे. कृष्णा राजेश वडजे (इयत्ता १०वी) व शिवम ज्ञानेश्वर वडजे (इयत्ता ६वी) अशी या भावंडांची नावे आहेत. टाकाऊ वस्तूंचा वापर करून केवळ तीन हजार रुपयांचा खर्च करून या मुलांनी ही सायकल तयार केली. हे दोन्ही विद्यार्थी राजारामनगर(वरखेडा) येथील कादवा इंग्लिश स्कुलचे विद्यार्थी आहेत.

कृष्णा आणि शिवम या दोन भावांनी तयार केलेली सायकल

अशी झाली सायकल तयार -

ही सायकल तयार करण्यासाठी 12 व्होल्ट व 250 वॅटची मोटर, 12 व्होल्टची बॅटरी, एमसीबी स्विच, 1.5 क्रमांकाची वायर, दुचाकीच्या इंजिनचे स्पोकेट, इंजिनमधील टायमिंग चेन यांचा वापर केला आहे. सायकलला मोटर बसवण्यासाठी लोखंडाची पट्टी बसवून सायकलच्या पुढच्या चाकाला वेल्डिंग केली व तिथे मोटार बसवली. टायमिंग चेन मापानुसार कमी करून ही मोटर बसवली आहे. एमसीबी स्विच ब्रेकजवळ जोडलेले असून त्यांची वायर बॅटरीशी जोडली आहे. ही बॅटरी चार्जकरून ३० मिनिटात 5 किमी अंतर ही सायकल पार करते.

या प्रयोगाबद्दल या दोन्ही विद्यार्थ्यांचे कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, व्हाईस चेअरमन उत्तम बाबा भालेराव, सर्व संचालक आणि परिसरातील नागरिकांनी कौतुक केले आहे.

पुण्यातील मुलानेही केली होती गाडी तयार -

पुणे जिल्ह्यातील आंबाडे गावात राहणाऱ्या प्रसादनेही घरीच एक गाडी तयार केली होती. प्रसाद वाणिज्य शाखेच्या तिसऱ्या वर्षाला आहे. इंजिन, चाके, स्टेअरिंग असलेली ही तीन चाकांची गाडी त्याने शेतात काम करण्यासाठी बनवली. शेतातून गवताचे भारे, धान्य आणि पाणी वाहण्यासाठी या गाडीचा उपयोग होतो. अवघ्या 15 हजार रुपयांत टाकावू वस्तूंपासून प्रसादने ही गाडी तयार केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.