नाशिक : संतांनी रेड्याला शिकवलं. पण माणसांना कुठं शिकवलं, असे वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे ( Shushma Andhare Controversial Statement ) यांनी एका व्हिडीओ द्वारे केले होते. संत ज्ञानोबा माऊलींनी रेड्याकडून वेद वदवून घेतले होते. तोच दाखला देत अंधारेंनी हे वक्तव्य केले. पण त्यावरुन वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आणि त्यानंतर अंधारेंनी वारकरी संप्रदायाची माफी मागितली. तर आज सुषमा अंधारे यांच्या विरोधात वारकरी संप्रदायाने नाशिकमध्ये आंदोलन ( Warkari Sect agitation against Shushma Andhare) करण्यात आले.
गुन्हा दाखल करण्याची मागणी : अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करून यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी नाशिक जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाने केली आहे. अंधारे यांच्या विरोधात आज नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरतून वारकरी तसेच हिंदूवादी संघटनांनी एकत्रित येत मोर्चा काढला. यावेळी वारकऱ्यांनी अंधारे यांना भगवंतांनी सद्बुद्धी द्यावी यासाठी कीर्तन करण्यात आले. यानंतर रामकुंड परिसरा पर्यंत रॅली काढण्यात आली. अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा नाहीतर पुढच्या आठ दिवसात महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वारकरी संप्रदायाने दिला आहे.
सुषमा अंधारेंचे वक्तव्य : संतांनी रेड्याला शिकवले. पण माणसांना कुठं शिकवले, असे सुषमा अंधारे या व्हिडीओत म्हणाले. संत ज्ञानोबा माऊलींनी रेड्याकडून वेद वदवून घेतले होते. तोच दाखला देत अंधारेंनी हे वक्तव्य केले. पण त्यावरुन वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आणि त्यानंतर अंधारेंनी वारकरी संप्रदायाची माफी मागितली. त्या म्हणाल्या, वारकरी संप्रदायाला जर वाटत असेल, ताई तुमचे चुकत आहे. तर दोन्ही हात जोडून माफी मागताना गैर वाटणार नाही.