नाशिक - हाशहरातील विविध श्री कृष्ण मंदिरात जन्माष्टमीनिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. भाविकांची देखील सर्वच श्रीकृष्ण मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली आहे.थी घोडा पालखी, जय कन्हैया लाल की, असे म्हणत शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी दहीहंडीचा जल्लोष साजरा केला. चिमुकल्या मुलींनीही रास नृत्य करून श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त धूम केली. नाशिकच्या शाळांमध्ये जन्माष्टमीचा उत्सव बघायला मिळाला. येथील जेम्स स्कूलमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी श्री कृष्णाची वेशभूषा तर मुलींही राधेच्या वेशात आल्या होत्या.
यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नटखट मुरलीधराची छबी दिसत होती. शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना भगवान श्री कृष्ण, राधाबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली. यानंतर बाळ श्री कृष्ण आणि राधांनी नृत्य करत दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला. यावेळी शिक्षिका वर्षा पाटील, सुप्रिया धुमाळ, हर्षदा हिरे, कृष्णा जोशी, अर्चना मोरे, मीनाक्षी अहिरे, रुपाली पवार उपस्थित होत्या.
तसेच शहरातील विविध श्री कृष्ण मंदिरात जन्माष्टमीनिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. भाविकांची देखील सर्वच श्रीकृष्ण मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली आहे.